सुसज्ज रु ग्णालयाअभावी अनेकांनी गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:31 AM2017-12-10T06:31:52+5:302017-12-10T06:32:00+5:30
रसायनी पाताळगंगा हे नावारूपास आलेले औद्योगिक क्षेत्र आहे. येथील मोहोपाडा शहरालगत दांड-रसायनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असून, या महामार्गावरून नेहमी अपघात होत असतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा हे नावारूपास आलेले औद्योगिक क्षेत्र आहे. येथील मोहोपाडा शहरालगत दांड-रसायनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असून, या महामार्गावरून नेहमी अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मुंबईला न्यावे लागत आहे. या प्रवासात बराच वेळ वाया जात असल्याने काही वेळेला रुग्णाला रस्त्यातच आपला प्राण बºयाच वेळा गमवावा लागत आहे.
मोहोपाडा येथे सुसज्ज अशा शासकीय रुग्णालयाची आवश्यकता आहे. मोहोपाडा येथील तलावाशेजारी आरोग्य उपकेंद्र सन २००९मध्ये उभारण्यात आले आहे. या आरोग्य उपकेंद्रात आरोग्यसेवक आय. पी. पानगे, जी. एस. भगत, एस. एफ. म्हात्रे हे काम करीत आहेत. तसेच पाच सेविका असून, डॉ. राठोड व डॉ. रोकडे हे उपकेंद्राला भेट देत आहेत. मोहोपाडा उपकेंद्राच्या हद्दीत तळेगाव, पानशिल शिवनगर, मोहोपाडा, नवीन पोसरी, रिसवाडी,आंबिवली तसेच काही आदिवासीवाड्यांसह आणखी काही गावांचा समावेश होत असून, गावोगावी आरोग्यसेवक फिरत असल्याने येथील ३५ हजार लोकसंख्या पाहता, त्यांच्यावरील कामाचा ताण वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आह. दरम्यान, मोहोपाडा येथील उपकेंद्रात रुग्णांना वेळेवर उपचारासाठी योग्य व्यवस्था नसल्याने परिसरातील रु ग्ण चौक, अजिवली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शिवाय येथील उपकेंद्र हे दिवसाआड उघडे असल्याने रु ग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णाला उपचारासाठी सोई-सुविधा नसल्याने येणाºया रु ग्णांची संख्या फार कमी आहे. येथील रु ग्णसेविका डी. बी. पाटील, मीरा पाटील, माधुरी म्हात्रे, एम. बी. उपाध्ये, टी. व्ही. पाटील महिला रु ग्णांना उपचार देण्याचे काम करीत असून, येथे अनेक गरीब व गरजू महिलांचे बाळंतपण होत आहे. सर्पदंश झाल्यास तत्काळ औषधोपचाराची सुविधा या उपकेंद्रात उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरील आरोग्यकेंद्रात जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ उपचार न मिळाल्याने जीव गमावण्याची वेळ अनेक रुग्णांवर ओढावली आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत ३५ हजारांच्या आसपास लोकसंख्या असून, येथील आरोग्य उपकेंद्र पाहता आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व डॉक्टरांची कमतरता भासत आहे.