शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

बाजारपेठा बंद, मात्र रस्त्यावर विनाकामाची भटकंती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 1:07 AM

पनवेल परिसरात कारवाईची भीती राहिली नाही; स्वतःसोबत दुसऱ्यांचाही जीव धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल परिसरातील बाजारपेठा बंद असताना देखील रस्त्यावर नागरिकांची वर्दळ दिसून येत आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असे वारंवार राज्य शासनासह पालिका, प्रशासनाकडून सांगितले जात आहे. संचारबंदी असताना देखील नागरिकांचा वावर सुरू आहे. कोणतेही काम नसताना आपला आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून ही मंडळी भटकंती करताना दिसून येत आहेत. यावर वेळीच आवर घालण्याची गरज निर्माण झाली आहे.पनवेल पालिका क्षेत्रात दररोज साडेसहाशेच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण सापडत  आहेत. तरीसुद्धा नागरिकांमध्ये गांभीर्य राहिलेले दिसून येत आहे. १४ एप्रिलपासून संचारबंदी घोषित केली. त्यानुसार पनवेल पालिका क्षेत्रातील बाजारपेठा बंद असल्यातरी अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसून येतात. पनवेल परिसरातील बसस्थानक परिसर, उरण नाका, नवीन पनवेल त्याचबरोबर कळंबोली करवली नाका, कामोठे सेक्टर ३६ परिसरात मोठ्या प्रमाणात सकाळी आणि संध्याकाळी रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहेत. पोलिसांकडून अडवणूक केली तर विविध कारणे पुढे करत आपली सुटका करून घेत आहेत. त्याचबरोबर झोपडपट्टी परिसरात कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करण्यात येत आहे. 

सोशल डिस्टन्सिंगचा   उडाला फज्जा नवीन पनवेल, पनवेल, कळंबोली, कामोठे परिसरात संध्याकाळी नागरिक गप्पा मारताना दिसून येतात. विनाकारण रस्त्यावर फिरणे तसेच मित्रांसमवेत थांबण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत. तसेच सकाळी भाजी मंडईत गर्दी पहायला मिळत आहे. या ठिकाणी देखील सेाशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याची ओरड आहे.