शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

विवाहितेला बाळासह सोडले अहमदनगरला, पोलिसांची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 12:18 AM

पतीसोबत भांडण झाल्याने सोडले घर : न्हावा-शेवा पोलिसांची कामगिरी

मधुकर ठाकूर 

उरण : पतीबरोबर झालेल्या भांडणामुळे वैतागून आपल्या चार महिन्यांच्या बाळाला घेऊन कंटाळून मामाकडे निघालेली महिला चुकून जेएनपीटी परिसरात पोहोचली. या महिलेला न्हावा-शेवा ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गायकवाड यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावातील बहिणीकडे सुखरूप पोहोचविले. अवघड काळातही माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या पोलिसांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी गावातील शीतल राजू खंदारे (२२) ही पती आणि आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह राहते. १ जून रोजी तिचे पतीसोबत भांडण झाल्याने ती रागाच्या भरात बाळाला घेऊन पुण्यात राहणाºया मामाच्या घरी जाण्यास निघाली. त्यासाठी रस्त्यावर उभे राहून एका ट्रकचालकास विनवणी केल्याने तिला ट्रकचालकाने चाकण येथे सोडले. तिथून आणखी पुढे जाण्यासाठी दुसºया ट्रकचालकास सांगितल्यावर त्याने तिला न्हावा-शेवा परिसरात सोडले. खूप रात्र असल्याने व हा परिसर अनोळखी असल्याने ती जेएनपीटी परिसरात बाळाला घेऊन भटकत राहिली. या वेळी रात्रीच्या अंधारात तिच्यामागे कुत्रे लागल्याने ती घाबरून धावू लागली. धावताना ती न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी या महिलेची चौकशी करून तिला बाळासह महिला कक्षात ठेवले. त्यानंतर शीतलच्या मामाला फोनवरून माहिती दिली. मात्र मामाने तिला घरात घेण्यास नकार देऊन फोन बंद केला. यादरम्यान शीतलची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वच रिपोर्ट नॉर्मल होते. त्यामुळे या महिलेला काही दिवस आश्रमात ठेवण्यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सल्ला दिला. त्यानुसार शीतलला तिच्या बाळासह महिला आश्रमात नेण्यात आले. मात्र तिला आश्रमात ठेवण्यास नकार देण्यात आला. रागाच्या भरात पतीकडे जाण्यासही शीतल तयार नव्हती. त्यामुळे या महिलेला ठेवायचे कुठे, असा प्रश्न पोलिसांपुढे होता. न्हावा-शेवा पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गायकवाड यांनी शीतलची आई, पती आणि भावाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी शीतलच्या बहिणीशी संपर्क साधून तिला तिच्या बाळासह घेऊन जाण्यास सांगितले. तर शीतलच्या बहिणीनेसुद्धा तिच्या घरची परिस्थिती बिकट असल्याचे सांगून शीतलला घेण्यास असमर्थता दर्शविली.अखेर साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गायकवाड यांनी स्वत: शीतलच्या बहिणीकडे नेऊन सोडण्याचे निश्चित केले. सपोनि ज्योती गायकवाड, पोलीस हवालदार नीलेश भोसले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्याशी चर्चा करून शीतल आणि बाळाला स्वखर्चाने अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी फाटा येथे राहणाºया बहिणीकडे नेऊन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.आई-वडील गेले घेऊनन्हावा-शेवा ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती गायकवाड व पोलीस हवालदार नीलेश भोसले यांनी शीतल व तिच्या बाळाला बहिणीकडे सुखरूप सोडले. त्यानंतर तिचे आई-वडील तिला घरी घेऊन गेले असल्याची माहिती मिळाल्याचे ज्योती गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडthaneठाणे