आगरदांडा : मुरुड शहरातील समाजसेवक मोहन करंदेकर दरवर्षी २३ मार्च शहीद दिन वेगळ्या प्रकारे साजरा करतात. बुधवारी क्रांतिवीर भगतसिंग यांचा ८६ वा स्मृतिदिन हा शहीद दिन म्हणून साजरा करतो. मुरुडमध्ये आपल्या निवासस्थानी शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासह मंगल पांडे, मादाम कामा, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस, वासुदेव बळवंत फडके, भाई कोतवाल, चाफेकर, लोकमान्य टिळक, मदनलाल धिंग्रा व भारतमातेच्या प्रतिमेचे या दिवशी मनोभावे पूजन करून दिवसभर निर्जळी उपवास करतात.ठाण्याच्या पालिकेतून निवृत्त झालेले करंदेकर गेली कि त्येक वर्षे या दिवशी पहाटेपासून पाण्याचा एक थेंबही प्राशन न करता उपवास करतात. सायंकाळी ७ नंतर नैवेद्य दाखवितात विशेष म्हणजे त्या वेळी एका वाटीत पिण्याचे पाणीही ठेवलेले असते. त्यानंतर ते उपवासाची सांगता करतात. घरी आलेल्यांना या थोर पराक्रमी वीरकथा मुलांना कथा सांगतात. या वेळी त्यांच्या घरी मुरु डच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, नगरसेवक प्रमोद भायदे, गिरीश साळी, मानसी करंदेकर, दिलीप जोशी, रमेश सावरकर आदींसह शालेय विद्यार्थी व असंख्य मान्यवर भेट देऊन वीर हुतात्म्यांना मानवंदना दिली.नगराध्यक्षा स्नेहा पाटील म्हणाल्या की, मुरु डकर जनतेला मोहन करंदेकर व त्यांच्या कुटुंबाच्या देशभक्तीबद्दलचा अभिमान आहे. त्यांच्यामुळे तरुणांना या थोर वीर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अन्य वीर हुतात्म्यांची वीरकथा समजते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे त्या म्हणाल्या. (वार्ताहर)
मुरूडमध्ये शहीद दिनी हुतात्म्यांना अभिवादन
By admin | Published: March 24, 2017 1:16 AM