शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘मेमू’साठी मुंबईत आज सामूहिक आत्मदहन; पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 8:19 AM

पेणमधून पनवेल, मुंबई, डहाणूपर्यंत थेट गाड्यांची मागणी, लांब पल्ल्याच्या गाड्यांना हवा थांबा

वडखळ : पेण रेल्वे स्थानकातून पेण-पनवेल मेमू ही प्रवासी शटल रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी, तसेच पेण व रोहा स्थानकातून इएमयू किंवा मेमूची सेवा ही छत्रपती शिवाजी टर्मिनल व दादर, ठाणे, कल्याण, दिवा, वसई रोड व डहाणू रोडपर्यंत तातडीने सुरू करण्याची मागणी ‘मी पेणकर आम्ही पेणकर’ शाश्वत विकास समितीने निवेदनातून मध्य रेल्वेकडे केली आहे, तसेच ही सेवा तातडीने सुरू न झाल्यास ११ नोव्हेंबरला पेण-पनवेल मेमूच्या वाढदिवशीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 

मुंबईला अत्यंत जवळ असे, तसेच रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेले पेण हे जागतिक दर्जाचे  श्री गणपती व कलात्मक मूर्ती बनविण्याचे ठिकाण आहे. पेणचे पोहे, पापड, कुरडई, कडवे वाल, पेणची ताजी भाजी, ओली व सुकी मासळीही देशात, तसेच जगात प्रसिद्ध आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे मध्य रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या पेण स्थानकातून जलद गाडी, हॉलिडे स्पेशल व पेण ते  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ईएमयू रेल्वे सेवेची मागणी ‘मी पेणकर आम्ही पेणकर’ शाश्वत विकास समितीकडून केली जात आहे. या सेवेमुळे विद्यार्थी व कामगार वर्गाचा प्रवास सोईस्कर होणार आहे. विशेष म्हणजे, याबाबत दिल्ली येथे झालेल्या  प्रमुख अधिकारी सिग्नल  व ट्राफिक प्रमुख यांनी पाहणी केल्यानंतर सेवा सुरू करण्याबाबतचा अहवालही दिला आहे. मात्र पुढे काय झाले असा प्रश्न पडला आहे.

मध्य रेल्वेकडून निर्णय घेण्यात टाळाटाळ

जलद गाडी व हॉलिडे, विशेष गाड्या यांना विनंती थांबा व सर्व पेण-पनवेल-पेण ही ईएमयू व मेमू रेल्वे देण्याचा अधिकार महाव्यवस्थापकांना दिले आहेत, तरीही याबाबत निर्णय घेण्यात टाळाटाळ होत असल्याने, मूलभूत प्रवासी मानव अधिकाराचा हक्क मिळविण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महाव्यवस्थापकांच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात  सकाळी ११ वाजता सामूहिक आत्मदहनाचा इशारा समितीने दिला आहे.

पेणकरांचा लढा मूलभूत प्रवासी मानव अधिकाराचा हक्क मिळविण्यासाठी आहे. याच अनुषंगाने गुरुवारी मुंबईतील महाव्यवस्थापक  मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात  सकाळी ११ वाजता सामूहिक आत्मदहन करणार आहोत. या आंदोलनाला सर्वस्वी मध्य व कोकण रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरण्यात यावे. - योगेश म्हात्रे, समन्वयक, ‘मी पेणकर आम्ही पेणकर’, शाश्वत विकास समन्वय समिती

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNavi Mumbaiनवी मुंबई