लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर,पनवेल: मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यामुळे होणारी वाहतुक कोंडी नवीन नाही.शनिवार दि.26 रोजी या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीचा फटका स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांना बसला.
पनवेलच्या पुढे जिते ते तरणखोप याठिकाणी हि प्रचंड वाहतुक कोंडी झाली होती.शनिवारी रविवारी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढते त्यातच या मार्गावरील खड्डे वाहन चालकांची डोकेदुःखी ठरत आहेत.मुंबई गोवा महामार्गावरील एक मार्गिका गणपती पूर्वी पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे.याकरिता वारंवार सार्वजनिक बांधकाम मंत्री या मार्गाची पाहणी करून कामाचा आढावा घेत असतात आज सकाळीच मंत्री पाहणी करण्यासाठी आले असता ते वाहतुक कोंडीत अडकले दोन महिन्याच्या काळावधित चव्हाण यांचा हा पाचवा पाहणी दौरा आहे.