माथेरानमध्ये १०८ रुग्णवाहिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 03:55 AM2017-07-20T03:55:36+5:302017-07-20T03:55:36+5:30
या पर्यटन स्थळावर दरवर्षी लाखो पर्यटकांची नियमितपणे हजेरी असते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णांची देखभाल करणे ही स्थानिक प्रशासनाची महत्त्वाची
- लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : या पर्यटन स्थळावर दरवर्षी लाखो पर्यटकांची नियमितपणे हजेरी असते. त्यामुळे अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णांची देखभाल करणे ही स्थानिक प्रशासनाची महत्त्वाची भूमिका आहे. नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह आरोग्य मंत्री दीपक सावंत यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी येथील प्रामुख्याने भेडसावत असलेल्या स्थानिकांसह पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यावश्यक सेवा म्हणून १०८ ही रुग्णवाहिका सर्वच सोयीस्कर सुविधेसह मिळावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आरोग्य मंत्र्यांकडे करण्यात आली होती. याची दखल घेत आरोग्य मंत्र्यांनी येथे ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.
माथेरान येथे येणाऱ्या पर्यटकांना कुणी घोड्यावरून पडून जखमी झाल्यास अथवा अन्य कारणाने त्रस्त झाल्यास त्याला तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले पाहिजेत यासाठी सातत्याने गटनेते प्रसाद सावंत यांनी सुद्धा चार महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांनी लवकरच माथेरानमधील स्थानिकांच्या तसेच पर्यटकांच्या सेवेसाठी अत्याधुनिक यंत्रणायुक्त रु ग्णवाहिका उपलब्ध व्हावी अशा आशयाचे लेखी निवेदन दिल्यावरून सध्या ही रु ग्णवाहिका सर्वांच्या सेवेसाठी आरोग्य मंत्र्यांनी या पर्यटनस्थळासाठी उपलब्ध करून दिली आहे.
मागील वर्षात चार लोकांना हृदयविकाराने अत्यावश्यक सेवा उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागले होते, तर कुणा रु ग्णाला तातडीने अन्य ठिकाणी न्यावयाचे झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे ही बाब गांभीर्याने घेऊन या रु ग्णवाहिकेत डिफेब्रिलेटर, व्हेन्टिलेटर, व्ह्यालूमेट्रिक, इंफ्युजन पंप, सिरिंज इंफ्युजन पंप, मॉनिटर अशा स्वरूपाची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित असल्याने जर एखाद्या रुग्णाला हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब या गाडीत उपचार केले जातील. तसेच अन्य उपकरणांचा उपयोग सुद्धा रु ग्णाला हितकारी असणार आहे. एकंदरीतच या गाडीत असलेल्या अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून रु ग्णांचे प्राण वेळप्रसंगी वाचण्यास मदत होणार आहे. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नव्या धाटणीच्या अत्याधुनिक यंत्रणेच्या व्यवस्थेमुळे ही रु ग्णवाहिका सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यामुळे अनेकांचे वेळप्रसंगी प्राण वाचू शकतील.
- डॉ. उदय तांबे