टाकाऊ बाटल्यांपासून माथेरान नगर परिषदेस मिळतेय उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:01 AM2019-11-08T01:01:55+5:302019-11-08T01:02:20+5:30
दरवेळी स्वच्छ सर्व्हेक्षण वेळीच माथेरानमधील कचºयाचे मोठया प्रमाणात संकलन करून
माथेरान : येथे पर्यटकांची संख्या मोठया प्रमाणावर असल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या त्याचप्रमाणे अन्य मद्याच्या काचेच्या बाटल्यांचा खच गावातील गटारात आणि कचराकुंडीत इतस्तत: पडलेला असायचा. त्यामुळे मागील काळात येथे सर्वत्र अस्वच्छता दिसून येत होती. मात्र आता नगरपरिषदेच्या कचरा वेचक महिला आणि सफाई कामगार हे नियमितपणे गावातील लॉजिंग तसेच हॉटेलमध्ये जाऊन सर्वच प्रकारचा कचरा संकलन करीत असतात. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात असून या यामाध्यमातून नगरपरिषदेस उत्पन्न मिळत आहे.
दरवेळी स्वच्छ सर्व्हेक्षण वेळीच माथेरानमधील कचºयाचे मोठया प्रमाणात संकलन करून डंपिंग ग्राऊंडवर नेला जायचा. तर अनेकदा अन्य भागातून येणाºया महिला हे प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्या विक्रीसाठी नेत होत्या. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी प्रभारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यावर या टाकाऊ बाटल्यांचा नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन म्हणून सदूपयोग होऊ शकतो ही संकल्पना मांडली; आणि नगरपरिषदेच्या कचरा वेचक महिला आणि सफाई कामगार हे नियमितपणे गावातील लॉजिंग तसेच हॉटेलमध्ये जाऊन सर्वच प्रकारचा कचरा संकलन करीत असतात. या प्लास्टिक बाटल्या मशीनमध्ये बेलिंग करून जवळपास एक हजार बाटल्या गोणीत भरून विक्रीसाठी भंगार कंपनीमध्ये नेत आहेत. चार महिन्यापासून या माध्यमातून तीस हजार रुपयांचे उत्पन्न नगरपरिषदेला प्राप्त झाले आहे.
स्वच्छते बरोबर येथे मोठया प्रमाणावर साठत असलेल्या सर्व प्रकारच्या बाटल्या एकत्रित करून त्यांची विक्री केली जात आहे; यातूनच नगरपरिषदेला उत्पन्नाचे साधन मिळत आहे. त्यामुळे गावात स्वच्छता आणि प्लास्टिकपासून होणाºया प्रदूषणावर मात करता येईल.
- प्रसाद सावंत, बांधकाम सभापती, नगरपरिषद