लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : सुट्यांचा हंगाम सुरू असून, येथे येणाऱ्या असंख्य पर्यटकांना वाचनाची आवड असते. त्यामुळे ते आवर्जून येथील नगरपालिकेच्या ग्रंथालयास भेट देत असतात. अशावेळी त्यांना अभ्यासात्मक पुस्तकांची कमतरता भासू नये. ग्रंथालय परिसर स्वच्छता आणि कर्मचारी नियमित हजेरी लावतात की नाही. कुणा वाचकांची काही तक्र ार वा समस्या असल्यास त्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजेत यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी अनेक भागांची पाहणी करीत असताना अचानकपणे नगरपालिकेच्या ग्रंथालयास भेट देऊन एकंदरीतच संपूर्ण परिसराची पाहणी केली. या ग्रंथालयाच्या परिसरात अस्वच्छता आढळल्यामुळे नाराजी व्यक्त करून या वाचनालयांमध्ये आणि या सर्वच परिसराची स्वच्छता राखण्यासाठी संबंधित ग्रंथपालास सूचना दिल्या. काही दिवसांपूर्वी मुंबईच्या (पोखरण-ठाणे) येथील महिला पर्यटक वैशाली मुजुमदार यांनी काही आध्यात्मिक ग्रंथरूपी गुरु चरित्रे देणगी दाखल दिलेली आहेत, त्याचप्रमाणे मागील वर्षी मालाड -मुंबई येथील नियमितपणे दर आठवड्याला पायी प्रवास करून हजेरी लावणारे प्रदीप पुरोहित यांनी एकूण सोळा भगवद्गीता ग्रंथ देणगी रूपाने दिलेले आहेत याची पाहणी सुद्धा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले आदी उपस्थित होते.
माथेरान नगराध्यक्षांचा पाहणी दौरा
By admin | Published: May 13, 2017 1:13 AM