कर्जत : जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. या ठिकाणी वनविभागाचे एकमेव वाहनतळ आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या गाड्या उभ्या केल्या जातात; परंतु वाहनतळाचे हे क्षेत्र कमी असल्यामुळे अनेक पर्यटकांना त्रासाला सामोरे जावे लागते.पर्यटनाची गैरसोय दूर करण्यासाठी आणि नव्या वाहनतळासाठी महसूल विभागाचा एमपी ९३ हा प्लॉट मिळावा म्हणून नगरपालिकेने पाठपुरावा केला असून, या भूखंडाची महसूल व वनविभागाकडून संयुक्त पाहणी करण्यात आली.कर्जत तालुक्याचे प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, वनक्षेत्रपाल नारायण राठोड, माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप, प्रादेशिक परिवहन पनवेल विभागाचे निरीक्षक नीलेश धोटे, तहसीलदार अविनाश कोष्टी, पुरवठा लेखा अव्वल कारकून जगन्नाथ उबाळे, माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या संयुक्त विद्यमाने या जागेची पाहणी करण्यात आली. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी २००७ मध्ये या प्लॉटची माहिती घेऊन तो वन विभागाचा आहे की महसूल विभागाचा आहे, याची खातरजमा करून या जागेचा प्रस्ताव तयार करून नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून महसूल विभागाकडून तो नगरपालिकेस हस्तांतरित करावा, यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांना देण्यात आला. २००८ मध्ये जिल्हाधिकाºयानी फाइल कोकणभवन येथे पाठवली व २००९मध्ये ही फाइल नगरविकास खात्याचे प्रधान सचिव यांच्याकडे गेली. मात्र, वाहनतळासाठी निश्चित करण्यात आलेला भूखंड वन विभागाचा की महसूलाचा? याबाबत संबंधित विभागाकडून अभिप्राय न दिल्याने दोन्ही विभागांनी संयुक्तरीत्या पाहणी केली.माथेरानमधील एमपी९३ हा प्लॉट वन विभागाचा नाही. त्यामुळे लवकरच याबाबतचा अभिप्राय आम्ही महसूल विभागाला देऊ.- नारायण राठोड, वनक्षेत्रपालएमपी ९३ हा प्लॉट नगरपालिकेकडे हस्तांतरण झाल्यास या प्लॉटवर नगरपालिकेमार्फत सुसज्ज व अद्ययावत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल.- डॉ. सागर घोलप, मुख्याधिकारीमाथेरानमधील एमपी ९३ प्लॉटबद्दल वन विभागाचा अभिप्राय आलेला नाही. तो आला की निश्चित दिशा ठरवता येईल. एमएमआरडीए मार्फत अंतर्गत रस्ते सुस्थितीत झाले आणि शहरात ई-रिक्षा सुरू झाल्यास माथेरानचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लागतील.- दत्ता भडकवाड, प्रांताधिकारी
माथेरान दस्तुरीवरील वाहतूककोंडी सुटणार; एमपी ९३ प्लॉटची महसूल व वन विभागाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 2:36 AM