माथेरान : राज्यात सर्वत्र महागाईने डोके वर काढलेले असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने माथेरान नगर परिषद, व्यावसायिक आणि नागरिक यांना विश्वासात न घेता पाणीपट्टी दरात भरमसाठ वाढ केली आहे. ही दरवाढ अन्यायकारक असल्याने माथेरानचे ‘बँक बोन’ म्हणून ओळखले जाणारे पर्यटन उद्योग भुईसपाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर तातडीने चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदनाद्वारे केली आहे.माथेरानमध्ये पाण्याचा वाणिज्य वापर करणाºया ग्राहकांनाही दुपटीने वाढीव बिले आलेली आहेत. यापूर्वी प्रतिएक हजार लिटर्स पाण्यासाठी ४४ रुपये आकारले जायचे ते यापुढे ८९रुपये आकारले जाणार आहेत. हे दर वाणिज्य वापर करणाºया ग्राहकांना सर्वांनाच न परवडणारे आहेत. माथेरानमध्ये पर्यटनासाठी लोक येत असल्याने केवळ पर्यटनावर सर्वांचे जीवनमान अवलंबून आहे. त्यासाठी अनेकांनी आपल्याच राहत्या घरावर एक मजली अथवा बाजूलाच जागेप्रमाणे खोल्या बांधलेल्या आहेत, त्यामुळे पर्यटकांची स्वस्त दरात न्याहारी व निवासाची सोय होत आहे.लॉजधारकांना विश्वासात न घेता व कोणतीही पूर्वसूचना न देता ही केलेली भरमसाठ दरवाढ लॉजधारकांवर अन्यायकारक असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाने योग्य तो तोडगा काढावा. कार्यालयामार्फत सहकार्य न केल्यास ग्राहकांना पाणी बिले भरू दिली जाणार नाहीत, याची कार्यालयाने गंभीर दखल घ्यावी. याबाबत ग्राहकांच्या संबंधित बिलाबाबत तक्र ार असल्यास तसेच जोपर्यंत याबाबत योग्य तो निर्णय होत नाही, तोपर्यंत पाणी ग्राहकांनी आपली पाणी बिले भरू नये, असे नगरसेवक चंद्रकांत जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते वसंत कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे बाजारात फलकाद्वारे जाहीर केलेआहे.आम्हाला वीज बिल तसेच कामगार पगार आणि अन्य मार्गाने वर्षाकाठी तीन कोटी रु पये खर्च येत असून, जेमतेम सव्वादोन कोटी रुपये बिलांच्या माध्यमातून मिळतात. मागील काळात ज्यांना प्रतिएक हजार लिटर्स पाणी वापरासाठी ४४ रु पये आकारले आहेत, अशांना ८९ रु पये आम्ही आॅडिट रिमार्कनुसार आकारणार आहोत. यामध्येसुद्धा स्वीमिंग पूल, साधी हॉटेल्स आणि घरगुती लॉजिंग्स यांच्या वर्गवारीप्रमाणेच ही वाणिज्य दराने बिले घेणार आहोत.- एस.एस.मगदूम, उपविभागीय अभियंता,कर्जत म.जि.प्रा.घरगुती पाणी ग्राहक हे प्रतिहजार लिटर्स वापराकरिता १७ रु पयेप्रमाणे बिल भरत आहेत. लॉजिंगधारक हेसुद्धा वाणिज्य दराने ४४ रुपयेप्रमाणे बिल भरत असतात. म्हणजे अडीच पटीने अधिक बिलांची रक्कम भरत असताना ८९ रुपये प्रमाणे बिल आकारणे हे चुकीचे असून हे अवाजवी दर कुणालाही परवडणारे नाहीत. येथे बाराही महिने पर्यटन व्यवसाय होत नसून, जेमतेम ८० ते १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध होत आहे. याबाबतीत प्राधिकरणाने सकारात्मकता दाखवणे गरजेचे आहे.- प्रसाद सावंत, गटनेते,माथेरान नगरपालिकास्थानिकांनी व्यक्त के ली नाराजीमाथेरानमध्ये मोठ्या प्रमाणावरे पर्यटकांची गर्दी असते. त्यामुळे येथील पाण्याची गरज ही मोठी आहे. येथील स्थानिकांचा उदरनिर्वाह येथील पर्यटन व्यवसायावरच चालतो. आता येथे पाणी बिलात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दरवाढ के ल्याने स्थानिकांकडून नाराजी व्यक्त के ली जात आहे.लॉजधारकांना विश्वासात न घेता व कोणतीही पूर्वसूचना न देता ही भरमसाठ दरवाढ के ल्याने माथेरानकरांकडून संताप व्यक्त के ला जात आहे.दोन ते चार रूम असलेल्या लॉजधारकांकडून वाणिज्य दराने बिले न घेता घरगुती दराने वसुली करावी. राज्यात एवढे दर कुठेच आकारले जात नाहीत. जर या खात्याला ही सिस्टीम जमत नसेल तर नगरपालिकेने ही सिस्टीम ताब्यात घेऊन प्राधिकरणाकडून होणारी लूटमार थांबवावी. स्टॅण्ड पोस्टसुद्धा पुन्हा सुरू करावेत.- प्रकाश सुतार, माजी नगरसेवक
माथेरानमध्ये पाणी बिलात दुपटीने वाढ, स्थानिकांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 1:49 AM