शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

माथेरानला विविध समस्यांचा विळखा, महात्मा गांधी रस्त्याची दुर्दशा, शौचालय नसल्याने पर्यटकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 2:43 AM

विश्वसुंदर पर्यटन स्थळाची ख्याती असलेल्या माथेरानची खरी ओळख लाल माती व नागमोडी रस्ता, परंतु पावसामुळे येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याचबरोबर येथील शौचालये सुस्थितीत नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.

माथेरान : विश्वसुंदर पर्यटन स्थळाची ख्याती असलेल्या माथेरानची खरी ओळख लाल माती व नागमोडी रस्ता, परंतु पावसामुळे येथील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याचबरोबर येथील शौचालये सुस्थितीत नसल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.माथेरानमधील महात्मा गांधी रस्ता व अंतर्गत रस्त्याची फार दुर्दशा झाली आहे. त्यामुळे येथे असणाºया आबालवृद्धांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जगभरातून माथेरानला पर्यटक भेट देत असतात. त्यात माथेरानच्या लाल मातीच्या रस्त्यांचे महत्त्वाचे आकर्षण लाल मातीचा रंग चपलांवर दिसताच माथेरान हे नाव डोळ्यासमोर उभे राहते. परंतु जोरदार पावसामुळे या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मागील वर्षी १२ सप्टेंबर २०१६ पर्यंत ३४८९ मि.मी.पावसाची नोंद झाली होती, तर १२ सप्टेंबर २०१७ पर्यंत ४६७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच गेल्यावर्षीच्या तुलनेत ११८२ मिमी जास्त पाऊस झाला आहे. यावर्षी अतिवृष्टीचे प्रमाण जास्त झाल्याने मातीची जास्त प्रमाणात धूप होऊन रस्त्याची चाळण झाली आहे. पेव्हर ब्लॉक सुद्धा उखडले आहेत. दगडगोटे रस्त्यावर जास्त असल्याने ज्येष्ठ नागरिकांना चालणे कठीण झाले आहे.>शौचालयाचे काम मार्गी लावामाथेरान : माथेरानच्या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी असलेल्या कापडिया मार्केट येथील सुलभ शौचालयाला सुरू होण्यास विलंब होत असल्याने याचा नाहक त्रास येथील व्यापारीवर्गासह पर्यटकांना सोसावा लागत आहे. यासाठी कापडिया मार्केटच्या व्यापारी मंडळींनी शुक्रवारी अपूर्ण सुलभ शौचालयाचे काम तातडीने मार्गी लावावे, अन्यथा आम्ही लोकवर्गणीतून ते पूर्ण करून घेऊ, या आशयाचे व्यापाºयांच्या सह्यांचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. सागर घोलप यांना दिले. गावात एकू णआठ ठिकाणी नगरपालिका आणि एम.एम.आर.डी.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने शौचालय उभारणीचा भूमिपूजन समारंभ राज्याचे तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते २००८ मध्ये करण्यात आले होते; परंतु अद्याप हे मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी असलेले सुलभ शौचालय पूर्णत्वास गेलेले नसल्याने, याचा नाहक त्रास येथील दुकानदार, व्यापारी वर्गासह विशेषत: महिलापर्यटकांना अनेक अडचणींचा सामना सातत्याने करावा लागत आहे. यासाठी हे काम जर नगरपालिका पूर्ण करीत नसेल, तर आम्ही लोकवर्गणीतून हे काम पूर्ण करून घेऊ, असे या निवेदनात कापडिया मार्केटमधील व्यापारी वर्गाने नमूद केले आहे. या वेळी कापडिया मार्केटचे अध्यक्ष मंगेश शिंदे, माथेरान नागरी पतसंस्थेचे संचालक हेमंत पवार, मनोज चव्हाण, विठ्ठलराव पवार, भास्करराव शिंदे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.गावात बनविलेल्या इतर सुलभ शौचालयांपेक्षाही हे शौचालय मुख्य रहदारीच्या भागात असल्याने याचा वापर पर्यटक मोठ्या संख्येने करतात, त्यामुळे हे शौचालय चांगल्या दर्जाचे बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३० आॅक्टोबरपर्यंत या शौचालयाचे लोकार्पण करण्यात येईल.- प्रसाद सावंत, नगरसेवकया शौचालयाचे अपूर्ण काम दिवाळीपूर्वी पूर्ण केले जाईल, त्याबाबत आम्ही संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत.- डॉ. सागर घोलप,मुख्याधिकारी माथेरान नगरपालिका>नागरिक त्रस्तनगरपालिकेने टॅक्सी स्टॅन्डपासून बाजारपेठ, हॉटेल्सना जोडणारा महात्मा गांधी रस्ता हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे वर्ग केल्यामुळे आता हा रस्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कधी करून माथेरानच्या सर्वसामान्य जनतेला मूलभूत सुविधा देऊन समाधानी कधी करतात याकडे सर्वांचे डोळे लागून राहिले आहे.अतिवृष्टी होऊन माथेरानचे रस्ते खराब झाले आहेत. अंतर्गत रस्त्यांच्या परवानगीसाठी आम्ही सनियंत्रण समितीकडे परवानगी मागितली आहे. लवकरच या अंतर्गत रस्त्याच्या कामाला गती येईल.- प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षामहात्मा गांधी रस्त्याच्या कामासाठी ४६ कोटी निधी उपलब्ध आहे. या रस्त्याच्या कामासाठी नगरपालिकेने हिरवा कंदील दाखविलेला आहे. परंतु सनियंत्रण समितीने वन विभागाची परवानगी घेऊनच कामाला सुरु वात करावी असा आदेश दिल्याने वन विभागाने परवानगी दिल्यानंतर कामाला सुरु वात होईल. याबाबत दोन वेळा निविदा काढण्यात आल्या होत्या, परंतु तीन निविदा भरल्या नसल्याने ती निविदा पुन्हा काढणार आहोत.- अरविंद धाबे, कार्यकारी अभियंता, मु.म.प्र.वि. प्रा.