कचरामुक्त शहरांमध्ये माथेरानला मिळाले ‘थ्री स्टार’ मानांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 11:40 PM2020-05-20T23:40:47+5:302020-05-20T23:41:12+5:30
माथेरानला मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे येथे सर्व कामे ही मनुष्यबळावर केली जातात. यामध्ये माथेरानची स्वच्छता ही मनुष्यबळावर केली जाते.
नेरळ : माथेरान हे पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असून प्रदूषणमुक्त शहर म्हणून माथेरानकडे पाहिले जात होते. आता तर स्वच्छतेमध्ये माथेरान नगरपरिषदेने एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२०’मध्ये माथेरान हे डम्पिंगमुक्त शहर घोषित झाले आहे. या सर्वेक्षणात माथेरानला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे.
माथेरानला मोटार वाहनांना बंदी असल्यामुळे येथे सर्व कामे ही मनुष्यबळावर केली जातात. यामध्ये माथेरानची स्वच्छता ही मनुष्यबळावर केली जाते. संपूर्ण शहरातील कचरा एकत्र करून हातगाडीमार्फत डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकला जायचा. त्याच वेळेस माथेरान नगरपरिषदेतील मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी डम्पिंगमुक्त माथेरान करण्याच्या हालचाली सुरू केल्या. याचे नियोजन नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत व आरोग्य सभापती आकाश चौधरी, गटनेते तसेच इतर सर्व नगरसेवकांसोबत सुरू केले. रामदास कोकरे यांनी ओला कचरा आणि सुका कचरा याचे वर्गीकरण करण्यासाठी प्रयत्न के ला आणिनागरिकांना याची सवय लागावी, म्हणून सतत जनजागृती केली. डम्पिंग ग्राउंडवर पडलेले प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, इतर कचरा यांचे वेगवेगळ्या ठिकाणी वर्गीकरण केले. यामध्ये काचेच्या बाटल्या, प्लास्टिक विकून पालिकेचे दोन लाख रुपये उत्पन्न वाढविले. तसेच इतर कचऱ्याचे मातीमध्ये रूपांतर करून त्यापासून खत तयार करून हे खत हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांना अल्प दारात देऊन पालिकेचे उत्पन्न वाढविले होते.
माथेरानचा डम्पिंग हे कचरामुक्त केले होते. हे सर्व नियोजनबद्ध काम केल्यामुळे याची दखल स्वच्छ सर्वेक्षणात घेण्यात आली. त्यामुळे महाबळेश्वर, मलकापूरनंतर माथेरान शहर हे तिसºया क्रमांकावर येऊन थ्री स्टार मानांकनाचे मानकरी ठरले आहे. माथेरानला मनुष्यबळ लावून स्वच्छतेचे काम करणे हे एक आव्हान होते. मागील दोन वर्षांपासून माथेरानची स्वच्छता नियोजन पद्धतीने सुरू ठेवली. यामध्ये नगराध्यक्षा आणि नगरसेवकांनी ही मोलाची भूमिका बजावली. स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये माथेरान पहिल्या तीन स्थानामध्ये येणे अपेक्षित होते; पण तसे झाले नाही. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. त्याच फलित आम्हाला मिळाले त्याचा आनंद आहे, असे तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे म्हणाले.
च्छ सर्वेक्षणात ही कामे ठरली महत्त्वपूर्ण...
घोड्याची लीद संकलित करून तिच्यापासून गॅसनिर्मिती करून पथदिवे उजळवले.
हॉटेल किचन वेस्टवर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस तयार करून पथदिवे उजळवले.
प्लास्टिक नष्ट करण्यासाठी क्रशर मशिनद्वारे प्लास्टिकची विल्हेवाट लावून पालिकेला उत्पन्न मिळविले.
काचेच्या बाटल्यापासून हॉटेल आणि बंगल्याच्या कंपाउंडच्या भिंतीसाठी उपयोग करून नगरपालिकेच्या उत्पनात वाढ केली.
इतर कचºयापासून खत तयार करून हॉटेलधारकांना विकून पालिकेच्या उत्पन्नात भर.