शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
2
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
3
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
4
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
5
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
6
ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?
7
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका
8
T20 WC 24 : आम्ही कमी पडलो, तुमचं प्रेम, टीका यासाठी आभार; श्रेयांका पाटीलची प्रामाणिक कबुली
9
गायत्री शिंगणेंची बंडाची तयारी! शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही, तर...
10
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
11
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
12
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
13
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
15
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
16
गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीमध्ये मोठा अपघात! विषारी वायूमुळे पाच कामगारांचा मृत्यू
17
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
18
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
19
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
20
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...

Matheran: मिनी ट्रेन लवकरच रुळावर, तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीत या मार्गाचे अतोनात झाले होते नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 1:16 PM

Matheran:

मुकुंद रांजाणेमाथेरान : पर्यटकांसह माथेरान नगरीचे मुख्य आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या सफारीसाठी देश-विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देतात. सन २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीत या मार्गाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे ही ट्रेन बंद झाल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. मात्र, येत्या नोव्हेंबरपर्यंत नेरळ-माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी दिली. त्यामुळे लवकरच पुन्हा मिनी ट्रेनची सफर करता येईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

    माथेरान मिनी ट्रेन सुरू करण्याच्या सततच्या मागणीनंतर या मार्गाच्या पाहणीनंतर सुरक्षिततेचे अनेक उपाय सुचवून ही ट्रेन सुरू करावी, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुचविले होते.     त्यानुसार कामे सुरू असून त्याची पाहणी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांनी रेल्वे मार्गाची पाहणी करून माथेरान स्थानकाला भेट दिली, यावेळी ते बोलत होते. 

बोगी वाढवण्याची मागणी रायगड जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस अजय सावंत यांनी त्यांची भेट घेऊन नेरळ माथेरान मिनी ट्रेन लवकर सुरू व्हावी. तसेच, सध्या अस्तित्वात असलेल्या शटल सेवेच्या बोगींमध्ये वाढ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. त्याची तत्काळ दखल घेत लाहोटी यांनी दोन बोग्यांची वाढ करण्याची ग्वाही दिली. सध्या माथेरानमध्ये वाढीव बोगी उपलब्ध नसल्याने नेरळ येथून दोन नवीन बोगी आणून ही सेवा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक लाहोटी, विभागीय प्रबंधक सलग गोयल यांनी विविध अभियंत्यांसोबत नेरळ माथेरान मार्गाची पाहणी करतानाच अनेक सूचनाही केल्या. 

रेल्वे स्लीपर बदलण्याचे काम सुरूसुरक्षिततेच्या कारणासाठी या मार्गावरील सर्व रुळ बदलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून त्यानुसार येथील रेल्वे स्लीपर बदलण्याचे काम सुरू झाले आहे. हे काम आता येथील जुम्मापट्टी स्थानकापर्यंत होत आलेले आहे.

टॅग्स :Matheranमाथेरानrailwayरेल्वे