कर्जत : पावसाळ्यात नेरळ-माथेरान दरम्यान बंद असणारी मिनीट्रेन शुक्रवारपासून पुन्हा पर्यटकांच्या सेवेमध्ये रुजू झाली आहे. सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी नेरळ स्थानकातून ही ट्रेन पर्यटकांना घेऊन माथेरानच्या दिशेने निघाली. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात डोंगरदऱ्यांतून जाणाºया मिनीट्रेनचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते.नेरळहून दररोज सकाळी एक गाडी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी माथेरानच्या दिशेने निघेल, तर दुपारी २ वाजून २० मिनिटांनी ती माथेरानवरून नेरळच्या दिशेने प्रवास सुरू करेल. एक अतिरिक्त गाडी शुक्र वारी सकाळी ९ वाजता नेरळवरून माथेरानच्या दिशेने निघेल आणि सोमवारी ३ वाजून ४० मिनिटांनी माथेरानवरून नेरळच्या दिशेने प्रवास सुरू करेल. धुक्याची दुलई लपेटलेले डोंगर त्यातून पुढे पुढे सरकणाºया मिनीट्रेनचा प्रवास अनेकांसाठी अविस्मरणीय होता.
माथेरान मिनीट्रेन पुन्हा रुळावर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 3:02 AM