माथेरान, मुरुडमध्ये पर्यटकांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:58 AM2017-12-25T00:58:48+5:302017-12-25T00:58:48+5:30

सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी मुरु ड जंजिरा व काशिद समुद्रकिनारी तुफान गर्दी केली आहे. मुरु ड येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रविवारी सकाळपासूनच राजपुरी जेट्टी

Matheran, Murud, tourists flood | माथेरान, मुरुडमध्ये पर्यटकांचा महापूर

माथेरान, मुरुडमध्ये पर्यटकांचा महापूर

Next

मुरुड/ नांदगाव : सलग तीन दिवसांच्या सुट्ट्या आल्याने पर्यटकांनी मुरु ड जंजिरा व काशिद समुद्रकिनारी तुफान गर्दी केली आहे. मुरु ड येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी रविवारी सकाळपासूनच राजपुरी जेट्टी, खोरा बंदर, आगरदांडा जेट्टी तसेच दिघी येथूनही हजारोंच्या संख्येने किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूस गाड्या पार्क करून ठेवल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या आल्याने शहरात वाहतूककोंडी झाली होती.
मुरु ड शहरातील सर्व लॉजेस सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे हाउसफुल झाले होते. तर प्रत्येक हॉटेलमध्ये भोजनासाठी मोठ्या
रांगा पाहावयास मिळाल्या. शनिवार, रविवार व सोमवारी नाताळची
सुट्टी असल्याने प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली.
काशिद येथेसुद्धा मोठी गर्दी पाहावयास मिळाली आहे. या
सलग सुट्ट्यांची बुकिंग पर्यटकांनी महिनाभर अगोदरच करून ठेवल्याने नवीन येणाºया पर्यटकांना येथे राहण्याची व्यवस्था झाली नाही. काशिद समुद्रकिनाºयाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूस प्रचंड वाहनांची गर्दी झाली होती.
रविवारी मुरु ड बाजारपेठ, खोरा बंदर, राजपुरी गाव, मुरु ड
शहरातील मासळी मार्केट रस्ता
आदी ठिकाणी वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूककोंडी झाली होती. मागील शनिवार, रविवारपेक्षा या वेळी चौपट पर्यटक आल्याने येथे सर्वच ठिकाणी वाहनांची गर्दी पाहावयास मिळत होती.

पर्यटकांची माथेरानला पसंती
माथेरान : ख्रिसमस आणि सलग सुट्ट्यांच्या आलेल्या या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात नवीन वर्षाच्या आगमनापर्यंत माथेरानमधील सर्वच हॉटेल्स आणि लॉजिंग हाउसफुल आहेत. पर्यटकांनी जवळचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला सर्वाधिक पसंती दर्शविल्याचे एकंदरच शनिवारी झालेल्या गर्दीमुळे स्पष्टपणे दिसत आहे.
सुट्ट्यांच्या या वीके ण्ड करिता पर्यटकांनी आपला मोर्चा माथेरानच्या दिशेने वळविलेला आहे. जवळपास ६० हॉटेल्स आणि ५००पेक्षा अधिक घरगुती लॉजिंगच्या खोल्यासुद्धा प्रसंगी अपुºया पडत असतात. अशा वेळी नेहमी येणाºया पर्यटकांनी अगोदरच हॉटेल्स आणि लॉजिंगची आरक्षण केलेली आहेत.
पॉइंटसवरील छोट्या छोट्या स्टॉल्सधारकांनी सुद्धा आपापल्या स्टॉल्सवर सुशोभीकरण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. गावातील मुख्य हॉटेल्समध्ये रंगीबेरंगी विद्युत रोषणाई केलेली दिसत आहे. या सुट्ट्यांच्या हंगामात लहान-मोठ्या स्टॉलधारकांसह रेस्टॉरंट, दुकानदार तसेच मोलमजुरी करणाºया श्रमिक अशा सर्वानाच उत्तम रोजगार पर्यटकांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.

Web Title: Matheran, Murud, tourists flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.