माथेरान : नगरपरिषदेनंतर आता वन विभागानेसुद्धा माथेरानच्या बेकायदा बांधकामाविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी वन विभागाच्या जागेवरील बेकायदा बांधकाम हटविले. एकापाठोपाठ एक होणाऱ्या या कारवायांमुळे माथेरानकर धास्तावले आहेत.बॉम्बे एन्वारमेंट अॅक्शन ग्रुपने हरित लवादामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने वन विभागास हा आदेश दिला. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरानचे वनपाल जी. पी. चव्हाण, नेरळचे वनपाल डी. ए. निरगुडे, दस्तुरी पार्किंगचे वनपाल पी. ए. खाडे, वनरक्षक आदींनी सकाळी १० वाजल्यापासून कारवाईला सुरुवात केली. यावेळीमाथेरानमधील शार्लोट लेक, एको पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट, लॅन्ड स्केप पॉइंट, हनिमून, लुईझा पॉइंटवरील बेकायदा स्टॉलधारकांवर कारवाई केली. सुरुवातीला दिलेली जागा मापून अतिरिक्त जागेवरील बांधकाम हटविण्यात आले. अशा वेगवेगळ्या खात्यांच्या कारवाईने माथेरानकर धास्तावले असून आम्ही माथेरानमध्ये राहायचे की नाही, असा प्रश्न येथील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर) माथेरानकरांचे शरद पवारांना साकडेमाथेरान : माथेरानकर आपलीच बांधकामे तोडण्यासाठी आलेल्या आसमानी संकटामुळे पुरते हैराण झाले आहेत. या संकटापासून मुक्ती मिळविण्यासाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढे माथेरानकरांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईमध्ये समक्ष भेट घेऊन माथेरानमधील अनधिकृत बांधकामांवर आलेल्या संकटाचा निपटारा करण्याचा माग काढण्याची विनंती के ली. यातून काहीतरी सुवर्णमध्य काढावा, यासाठी माथेरानमधील शिष्टमंडळाने सोमवार, १३ फे ब्रुवारीलाशरद पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. या वेळी आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, विवेक चौधरी, विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक दयानंद डोईफोडे, निसार मुजावर आदी उपस्थित होते. शासनाच्या विकास आराखड्याबाबतीत झालेल्या दिरंगाईमुळे स्थानिकांना नाहक मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
माथेरानमध्ये आता वनविभागाचाही हातोडा
By admin | Published: February 15, 2017 4:53 AM