माथेरान शटलच्या सात फे-या करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 01:05 AM2018-02-22T01:05:59+5:302018-02-22T01:05:59+5:30

अमनलॉज ते माथेरान स्थानकापर्यंत शटल सेवेच्या फेºया वाढविण्यात याव्यात, अशी माथेरानकरांची सातत्याने मागणी होत असल्याने यापुढे शटलच्या पाचऐवजी सा

 Matheran shuttle festivals | माथेरान शटलच्या सात फे-या करणार

माथेरान शटलच्या सात फे-या करणार

Next

माथेरान : अमनलॉज ते माथेरान स्थानकापर्यंत शटल सेवेच्या फेºया वाढविण्यात याव्यात, अशी माथेरानकरांची सातत्याने मागणी होत असल्याने यापुढे शटलच्या पाचऐवजी सात फेºया करण्यात येतील, असे आश्वासन रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. जैन यांनी माथेरानकरांना दिले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
माथेरानकरिता सध्या अमनलॉज ते माथेरान स्टेशनपर्यंत शटल सेवेच्या माध्यमातून केवळ पाच फेºया होत आहेत. त्यामुळे काहीअंशी का होईना, येथील पर्यटन व्यवसायाला गती प्राप्त झाली असली, तरीसुद्धा या शटलच्या मर्यादित फेºया असल्याने अनेक पर्यटकांना या गाडीचा आनंद उपभोगता येत नाही. २१ फे ब्रुवारीला रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. जैन यांनी माथेरानला धावती भेट दिली. या वेळी त्यांना माजी नगराध्यक्ष अजय सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरसेविका प्रतिभा घावरे, माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी लेखी निवेदन देऊन रेल्वेच्या बाबतीत असलेल्या समस्या सांगितल्या. त्यानुसार अमनलॉज ते माथेरान दरम्यान यापुढे सात फेºया करण्यात येतील, असे जैन यांनी आश्वासन दिले.
जैन यांना रेल्वेस्थानकातील पर्यटकांना भेडसावत असलेल्या अडचणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पारटे, नितीन सावंत यांनी निदर्शनास आणून दिल्या. तर या शटलमध्ये पासधारकांना ऐन गर्दीच्या वेळी पायपीट करावी लागत आहे. याबाबत ठोस उपाययोजना करावी, असे माजी नगरसेवक प्रकाश सुतार यांनी जैन यांना सूचित केले. तर फलाट क्र मांक दोन वरील रेल्वे स्थानकाच्या आवरातील पडक्या इमारतीच्या जागेवर एखादे म्युझियम सुरू केल्यास पर्यटकांची संख्यासुद्धा निश्चितपणे वाढेल, असे माजी नगरसेवक संतोष पवार यांनी नमूद केले. शटलच्या सात फेºया करण्याच्या जैन यांच्या सकारात्मक निर्णयाचे माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांनी स्वागत केले. या वेळी माजी नगरसेवक दयानंद डोइफोडे, प्रदीप घावरे आदी उपस्थित होते.

Web Title:  Matheran shuttle festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.