माथेरानच्या कारवाईचे क्रि केट खेळावर सावट
By admin | Published: February 21, 2017 06:14 AM2017-02-21T06:14:04+5:302017-02-21T06:14:04+5:30
परीक्षांच्या पूर्वार्धात माथेरानमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत येथील आॅलिंपिया मैदानावर नियमितपणे
माथेरान : परीक्षांच्या पूर्वार्धात माथेरानमध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत येथील आॅलिंपिया मैदानावर नियमितपणे क्रि केट शौकीन आणि स्थानिक तसेच मुंबई, पुण्याकडील क्रि केटप्रेमी विविध संस्थांनी, मंडळांनी आयोजित केलेल्या क्रि केट स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवत असतात. परंतु यावेळेस पहिल्यांदाच माथेरानमधील अनधिकृत बांधकामांवर आलेल्या कारवाईमुळे तसेच क्रि केट खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदतीसाठी लोकप्रतिनिधी देखील पुढे सरसावले नसल्याने क्रि केटप्रेमींचा हिरमोड झाला आहे.
क्रि केटच्या स्पर्धा भरविण्याची ४० वर्षांपासूनची परंपरा कायम ठेवत किशोर क्रि केट संघाने स्पर्धांचे आयोजन अध्यक्ष रमेश जोशी, प्राध्यापक सुनील शिंदे, माजी नगरसेवक प्रकाश सुतार, हर्ष शिंदे, अनिल गायकवाड यांच्या वतीने करण्यात आले होते तर सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा प्रकाशझोतातील भव्य टेनिस बॉलचे सामने विद्यमान नगरसेवक प्रसाद सावंत यांनी गोल्डन स्टार क्रि केट संघाच्या माध्यमातून आयोजित केले होते. त्यामुळे प्रेक्षकांना खेळ पाहण्याचा आनंद लुटता आला. त्यानंतर सध्या तरी अनेक संघ देखील स्पर्धा भरविण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु पारितोषिक,चषक आणि फायनान्स देण्यासाठी आयोजक नसल्याने सर्वांची निराशा झालेली दिसत आहे. एव्हाना या दोन महिन्यात अनेक संघाचे खेळाडू त्यांना स्पॉन्सर करणाऱ्या सौजन्यधारकांचे क्रि केटचे युनिफार्म परिधान करून बाजारातून मिरवताना दिसत असतात. परंतु अनधिकृत बांधकामांवर आलेल्या कारवाईमुळेच अनेक स्पॉन्सर लोकांनी खेळाडूंवर दृष्टिक्षेप न टाकल्याने सर्वच क्र ीडाप्रेमींचा हिरमोड झाल्याने नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. (वार्ताहर)