माथेरानची वनसंपदा संकटात; जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 11:06 PM2019-12-10T23:06:20+5:302019-12-10T23:06:47+5:30

ग्याबियन वॉल करणे गरजेचे; विकासकामांसाठी अडचणी

Matheran's forest estate in crisis; Large amounts of sunshine | माथेरानची वनसंपदा संकटात; जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप

माथेरानची वनसंपदा संकटात; जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप

Next

माथेरान : माथेरानच्या पर्यावरणाचा समतोल आणि येथील पूर्वापार मूळ ओळख असणारी वनसंपदा कायमस्वरूपी अबाधित राहण्यासाठी पर्यावरणवाद्यांची नेहमीच आग्रही भूमिका राहिलेली आहे. त्यामुळे पुढील काळातही पर्यटकांना आकर्षित करणारे पॉइंट्स सुशोभित करण्यासाठी येथील वनसंपदेचा ºहास होऊ नये.

१५० ते २०० वर्षांपूर्वीच्या जुनाट वृक्षांची जोपासना करण्यासाठी त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. माथेरानमध्ये दरवर्षी २०० इंचच्या वर पाऊस पडतो. या वर्षी ३०० इंच पाऊस झाला, यामुळे मातीची धूप प्रचंड प्रमाणात झाली, यामुळे येथील वनसंपदा धोक्यात आली आहे. येथील पॉइंट्स तसेच इतर ठिकाणी होणारी जमिनीची धूप रोखण्यासाठी ग्याबियन वॉल करणे गरजेचे झाले आहे. ही वॉलची कामे येत्या तीन ते चार वर्षांत झाली नाही तर माथेरानला माळीण गावाची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही.

ग्याबियन वॉलसाठी लागणार काळा अथवा जांभा दगड घोड्यावर जात नाही, तसेच एका हातगाडीमध्ये १२ ते १४ दगडांचीच वाहतूक केली जाते, त्यामुळे ही पद्धत वेळ, श्रम खर्चिक तर आहेच; परंतु अशा पद्धतीने काम करण्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी लागू शकतो. या दरम्यान पर्यावरणाचा ºहास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.

हा संपूर्ण परिसर बिनशेतीचा भाग असून, प्रदूषणमुक्त पर्यटनस्थळ अशीच ओळख असलेल्या माथेरानमध्ये रुग्णवाहिका आणि अग्निशमन गाडीच्या व्यतिरिक्त अन्य वाहनांना परवानगी नाही. त्यामुळे येथील एकंदरच संपूर्ण पर्यटन हे येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून असते. येणारे पर्यटक हे विविध पॉइंट्सवरील नयनरम्य देखावे पाहण्यासाठी आवर्जून भेटी देत असतात.

पर्यटक आले तर येथील व्यापारी, दुकानदार, घोडा, हातरिक्षा, हॉटेल्स, लॉजधारक यांसह मोलमजुरी करणाºया श्रमिकांना रोजगार उपलब्ध होतो. तेव्हा येथील निसर्गसंपदा अबाधित राखणे गरजेचे आहे.

एमएमआयडीएकडून सुशोभीकरणाचे काम

सध्या एमएमआरडीएच्या माध्यमातून विविध पॉइंट्सच्या सुशोभीकरणाची कामे सुरू केली आहेत. त्यासाठी महत्त्वाच्या पॉइंट्सवर जुन्या झाडांचे संरक्षण करण्यासाठी आणि वनसंपदा हीच ओळख टिकवण्यासाठी पॉइंट्सवरील झाडांसभोवताली काळ्या दगडांची ग्याबियन वॉल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काळा दगड लागणार आहे. त्यातच दस्तुरी नाक्यापासून जवळपास चार ते पाच किलोमीटरची वाहतूक मानवी हातगाडी मधून करणे अशक्यप्राय बाब आहे.

त्यासाठी येथील पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामे होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मर्यादित वेळेसाठी ट्रॅक्टरला परवानगी दिली होती; परंतु काही मंडळींनी ठेकेदारास ट्रॅक्टरला परवानगी दिली आहे तर आम्हालाही जीवनावश्यक वस्तूंकरिता टेम्पो अथवा ट्रॅक्टर गावात आणण्यासाठी परवानगी देण्यात यावी, असा हट्ट धरला. मात्र, यामुळे अनेक विकासकामांमध्ये अडथळा येत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गावाचा विकास करण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी, जिल्हाधिकाºयांनी आता यातून सुवर्णमध्य काढून आलेला निधी परत जाऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माथेरानकरांकडून होत आहे.

Web Title: Matheran's forest estate in crisis; Large amounts of sunshine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.