आयफेल टॉवरपेक्षा सव्वादोनशे मीटर उंचीवरून धावणार माथेरानची फ्युुनिक्युलर रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 02:04 AM2020-09-06T02:04:46+5:302020-09-06T02:04:54+5:30

प्रस्तावित तिकीट ४०० रुपये

Matheran's funicular train will run at a height of 1200 meters above the Eiffel Tower | आयफेल टॉवरपेक्षा सव्वादोनशे मीटर उंचीवरून धावणार माथेरानची फ्युुनिक्युलर रेल्वे

आयफेल टॉवरपेक्षा सव्वादोनशे मीटर उंचीवरून धावणार माथेरानची फ्युुनिक्युलर रेल्वे

Next

- नारायण जाधव 

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानला जाण्यासाठी एमएमआरडीए ‘फ्युनिक्युलर रेल्वे’ सुरू करणार आहे. याबाबत केंद्र शासन अंगीकृत मे. राइट्स या संस्थेने तयार केलेल्या सुसाध्यता अहवालानुसार माथेरानची प्रस्तावित फ्युनिक्युलर रेल्वे फ्रान्सच्या आयफेल टॉवरपेक्षा सुमारे सव्वादोनशे मीटरहून अधिक उंचीवरून धावणार आहे. आयफेल टॉवरची उंची ३२४ मीटर असून, या प्रस्तावित फ्युनिक्युलरची उंची ५५० मीटर राहणार आहे.

माथेरान ते धोडनी मार्गावर ती धावणार असून, नवी मुंबईला अर्थात सिडकोच्या नैना क्षेत्राशी जोडण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर तिच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. यामुळे लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून निविदा मागवून कार्यवाहीचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

१०३ कोटींचा प्रस्तावित खर्च

सध्या माथेरानला रस्ता किंवा रेल्वेने जाण्यासाठी नेरळ-माथेरान हा एकमेव मार्ग आहे. यामुळे या थंड हवेच्या ठिकाणाला नवी मुंबईच्या दिशेने जोडण्यासाठी एमएमआरडीएने सर्वप्रथम २००९ साली मान्यता दिली होती. त्यानंतर, सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी मे. राइट्स या संस्थेची नियुक्ती केली. तिच्या अहवालानुसार, माथेरान ते धोडनी मार्गावरील १.९ किमीच्या घनदाट वनांमधून ती ५५० मीटर उंचीवरून धावणार असून, तिचा खर्च भारतीय चलनानुसार १०२ कोटी ९७ लाख, तर विदेशी चलनात १९५ कोटी चार लाख प्रस्तावित केला आहे.

पहिल्या वर्षी साडेचार लाख प्रवासी

धोडनी-माथेरान मार्गावर पहिल्या वर्षी चार लाख ४७ हजार ४७६, तर विसाव्या वर्षी सात लाख १७ हजार ३५७ प्रवासी प्रस्तावित करून मे. राइट्स यांनी प्रत्येकाला ४०० रुपये, तर लहान मुलांसाठी २०० रुपये तिकीटदर निश्चित केले आहेत.सध्याची टॉय ट्रेन एमएमआरडीए
चालविणार?

सध्या नेरळ-माथेरान मार्गावर धावणाऱ्या टॉय ट्रेनमध्ये सुधारणा करून ती प्राधिकरणामार्फत चालविण्याबाबत पडताळणी करण्याचेही या वेळी ठरले. तसेच हाजी मलंगची फ्युनिक्युलर रेल्वेही एमएमआरडीएने ताब्यात घेण्याचे नगरविकासमंत्र्यांनी सूचित के ले आहे.

इको-सेन्सिटिव्हचा अडथळा
सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावरील निविदांना प्रतिसाद न मिळाल्यास खरेदी बांधकाम विकास तत्त्वावरील अंमलबजावणीसही या वेळी मान्यता देण्यात आली. इको-सेन्सिटिव्हचा राहणारा अडथळा तिच्या मार्गात असून तो दूर करणे एक आव्हान आहे.

Web Title: Matheran's funicular train will run at a height of 1200 meters above the Eiffel Tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.