माथेरानची आरोग्यसेवा सुरळीत सुरू राहणार -सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 07:11 AM2017-11-28T07:11:17+5:302017-11-28T07:11:32+5:30

माथेरान या पर्यटनस्थळावर पर्यटकांची नित्यनियमाने गर्दी वाढत असताना त्यांना तसेच स्थानिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेच्या दवाखान्यात सर्वतोपरी औषधांचा साठा, अपुरा कर्मचारी वर्ग, उच्चशिक्षित एम.बी.बी.एस. डॉक्टरची नियुक्ती त्याचबरोबर आरोग्यसेवा निश्चितपणे सुरळीत होईल,

 Matheran's healthcare will continue smoothly - Sawant | माथेरानची आरोग्यसेवा सुरळीत सुरू राहणार -सावंत

माथेरानची आरोग्यसेवा सुरळीत सुरू राहणार -सावंत

googlenewsNext

माथेरान : माथेरान या पर्यटनस्थळावर पर्यटकांची नित्यनियमाने गर्दी वाढत असताना त्यांना तसेच स्थानिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नगरपालिकेच्या दवाखान्यात सर्वतोपरी औषधांचा साठा, अपुरा कर्मचारी वर्ग, उच्चशिक्षित एम.बी.बी.एस. डॉक्टरची नियुक्ती त्याचबरोबर आरोग्यसेवा निश्चितपणे सुरळीत होईल, असे आश्वासन आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी दिले. सोमवारी त्यांच्याच दालनात दुपारी १२.३० वाजता माथेरान तसेच अन्य भागातील आरोग्यसेवेच्या समस्यांबाबतीत एका विशेष बैठकीचे आयोजन त्यांनी केले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माथेरानच्या विद्यमान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, नगरपालिका गटनेते प्रसाद सावंत, मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप यासह माथेरान हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पतोडीया उपस्थित होते.
मागील आॅक्टोबर महिन्यात खुद्द आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी येथे भेट देऊन गावासह नगरपालिकेच्या दवाखान्याला प्रत्यक्ष भेट देऊन येथील अडचणी जाणून घेतल्या होत्या. त्यानुसार त्यांनी शल्य चिकित्सक
डॉ. अजित गवळी यांना दर महिन्यात दोन दिवस आरोग्य शिबिर घेण्याची सूचना केली असताना देखील कोणताही प्रकारचा कॅम्प लावला गेला नसल्याने डॉ. गवळी यांची त्यांनी कानउघडणी केली. यानंतर येत्या ३० नोव्हेंबरला हृदयविकार, लहान मुलांच्या आरोग्यदायी सेवेबाबत क ॅम्प लावण्याचे डॉ. गवळी यांनी कबूल केले आहे.
या कॅम्पसाठी माथेरान हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पतोडीया यांच्या ट्रस्ट मधून येणाºया वैद्यकीय अधिकाºयांचा खर्च केला जाणार आहे. त्याचबरोबर या दवाखान्यात अपुरा कर्मचारी वर्ग आहे. यामध्ये फार्मासिस्ट, महिला परिचारीका, वार्डबॉय ही पदे रिक्त असल्याने रु ग्णांची काहीअंशी गैरसोय होत असते. यासाठी लवकरच एम.बी.बी.एस. डॉक्टरची नेमणूक करण्यात येणार आहे.
लोधीवली येथील धीरूभाई अंबानी हॉस्पिटल बाबतीत यावेळी महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली. यावेळी उपसचिव अजित कवडे, संतोष पवार आरोग्य विभाग, प्र.स.सार्वजनिक आरोग्य विभाग, म.सा.ठोंबरे, उप संचालक रत्ना रावखंडे, लोधीवली येथील संजय ठाकूर, डॉ.प्रदीप व्यास यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

माथेरानच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. जनतेला आम्ही कृतीतून केलेली कामे दिसली पाहिजेत. हेच आमचे ध्येय आहे. दवाखान्यात आधुनिक यंत्र शास्त्रीय उपकरणे आणण्यासाठी तसेच पर्यटकांना सुद्धा अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आम्ही आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्या वेळोवेळी भेटी घेत आहोत. त्यानुसार ते आम्हाला मार्गदर्शन आणि कामे पूर्ण होण्यासाठी सहकार्य करीत आहेत.
- प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान नगरपालिका

Web Title:  Matheran's healthcare will continue smoothly - Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड