शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
2
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
3
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
4
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
5
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
6
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
7
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
8
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
10
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
11
पाकिस्तानात 8 वर्षांतील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला; पॅसेंजर वाहनावर ओपन फायरिंग, 39 जणांचा मृत्यू
12
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
13
अदानी ग्रुपचे शेअर्स घरसल्याने LICला मोठा धक्का; तब्बल १२ हजार कोटी रुपये बुडाल्याचा अंदाज
14
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
15
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
16
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
17
Shah Rukh Khan : शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीबाबत खळबळजनक खुलासा
18
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
19
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
20
Kalbhairav Jayanti 2024: कालभैरव जयंतीला 'हे' तोडगे करा आणि संसार तापातून मुक्त व्हा!

पाच महिन्यानंतर माथेरानची ‘महाराणी’ ऐटीत पुन्हा रूळावर, पावसाळ्यानंतर मिनिट्रेन सेवा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 8:33 AM

- मुकुंद रांजणे  माथेरान -  बुधवारी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी मोठ्या आवाजात गाडीची शीटी झाली आणि बहुप्रतिक्षित माथेरानची ...

- मुकुंद रांजणे माथेरान -  बुधवारी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी मोठ्या आवाजात गाडीची शीटी झाली आणि बहुप्रतिक्षित माथेरानची महाराणी अर्थान मिनी ट्रेन रूळावर दिमाखाने झुकू झुकू करत पळायला लागली. नेरळ रेल्वे स्थानकात १११ प्रवाशांना घेऊन या राणीने हंगामातील आपला पहिला प्रवास सुरू केला.

पर्यंटकांना खुणावणारी नेरळ ते माथेरान ही मिनीट्रेन सेवा पावसाळी काळात बंद असते. यावर्षी पाऊस परतला तरी ही सेवा सुरू न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती. पण बुधवारी नेरळ रेल्वे स्थानकातून निघालेली ही ट्रेन माथेरान स्थानकात ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहचली आणि सर्वांनी जल्लोष केला. पाच महिन्यानंतर  सुरू झालेल्या या पहिल्याच सेवेचा लाभ ९० प्रौढ व्यक्तींसह २१ लहान मुलांनी घेतला. 

हे महाराणी, पर्यटन हंगाम खूप बहरू दे...या ट्रेनचे सारथ्य मुख्य चालक म्हणून ठाणगे, तर सहचालक म्हणून लक्ष्मण हाबळे यांनी केले. दुसरी ट्रेन १० वाजून २५ मिनिटांनी निघाली ती १ वाजून ३० मिनिटांनी १०२ प्रवाशांना घेऊन माथेरानला पोहचली.चालक व स्टेशन प्रबंधक यांच्या हस्ते पूजा अर्चा करून या ट्रेनचे स्वागत करण्यात आले. नेरळ रेल्वे स्थानकातून समारंभपूर्वक हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ट्रेनने माथेरानच्या दिशेने प्रस्थान केले. 

५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर सेवेत- पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मान्सून काळात नेरळ ते माथेरान ही सेवा बंद ठेवण्यात येते. यावर्षी १६ जून रोजी ही सेवा बंद झाली होती.- दरवर्षी साधारण दसऱ्याला ही सेवा पूर्ववत केली जाते. मात्र देखभाल दुरुस्तीची कामे निघाल्याने यंदा ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला. या काळात अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा मात्र सुरू राहते.

आम्ही दुसऱ्यांदा माथेरानला फिरायला येत आहोत. सोबत आमचे राजस्थानचे कुटुंबही आहे. ट्रेन सुरू होणार आहे हे माहीत नव्हतं. पण इथे आल्यावर ते कळलं. खूप उत्साहित आहोत, या ट्रेनचा प्रवास करण्यासाठी.-सपना जैन, प्रवासी ऐरोली

माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून रेल्वे ट्रॅक नादुरुस्त होत असतात. गेले काही महिने कर्मचारी ट्रॅक दुरुस्तीच्या कामाला लागले होते. दुरूस्तीनंतर ही सेवा सुरू झाली असून दिवसभरातून दोन फेऱ्या चालवल्या जातील. यासह अमन लॉज ते माथेरान शटल सेवा ही सुरूच आहे.-गुरुनाथ पाटील, स्टेशन प्रबंधक, नेरळ

टॅग्स :Matheranमाथेरानrailwayरेल्वे