शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

माथेरानच्या मिनी ट्रेनचे जुने डबे भंगारात

By admin | Published: April 19, 2016 2:22 AM

नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे जुने प्रवासी डबे भंगारात काढले आहेत. नेरळ लोकोच्या बाहेर ३० वर्षांपूर्वीचे ९ प्रवासी डब्यांचे भाग सुटे करण्यात येत आहेत

विजय मांडे,  कर्जतनेरळ-माथेरान मिनीट्रेनचे जुने प्रवासी डबे भंगारात काढले आहेत. नेरळ लोकोच्या बाहेर ३० वर्षांपूर्वीचे ९ प्रवासी डब्यांचे भाग सुटे करण्यात येत आहेत. जुन्या पध्दतीचे मिनीट्रेनचे ते प्रवासी डबे अनेकांच्या स्मरणातील आठवण ठरले आहेत, त्यांचे सुटे भाग होताना अनेक पर्यटक प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली. खरे तर हे डबे संग्रही ठेवावेत, असेही काहींनी सूचित केले आहे.शतक महोत्सव साजरा केलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये अनेक बदल झाले आहेत. पूर्वी मिनीट्रेन वाफेचे इंजिन लावून जायची, त्यावेळी पावसाळ्यानंतर मिनीट्रेनच्या इंजिनामुळे रेल्वे मार्गाच्या आजूबाजूचा परिसर जळून जात होता. पुढे हे इंजिन डिझेलवर चालविले जाऊ लागले. आता ती वाफेवर चालणारी इंजिने डिझेलमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत, असे मोठे बदल मिनीट्रेनच्या प्रवासी डब्यांमध्ये रेल्वेने केले आहेत. १९७०-८० च्या दशकात नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या प्रवासात जे प्रवासी डबे वापरले गेले होते तेच त्यावेळी पावसाळ्यात देखील वापरले जायचे. दहा-पंधरा वर्षे प्रवासी पर्यटकांच्या सेवेत असलेल्या मिनीट्रेनच्या त्या प्रवासी डब्यांचे सर्व भाग खिळखिळे झाले होते. दुसरी बाब म्हणजे मागील दोन वर्षात मिनीट्रेनच्या दोन फेऱ्यांचे नवीन डबे नेरळ लोकोमध्ये पोहचले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ते नऊ प्रवासी डबे भंगारात काढण्याचा निर्णय घेतला.ते नेरळ लोकोच्या बाहेरून नेणे शक्य नसल्याने अखेर एका बाजूला घेवून त्या सर्व प्रवासी डब्यांचे भाग सुटे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ते प्रवासी डब्यांचा लिलाव घेतलेल्या ठेकेदाराने त्यांचे सुटे भाग वेगळे केले आहेत.