माथेरानमध्ये मालवाहतुकीचा प्रश्न गंभीर, जीवनावश्यक वस्तूंचे भाव चढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:39 AM2018-07-03T03:39:16+5:302018-07-03T03:39:24+5:30
माथेरानमध्ये वाहतुकीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मालवाहतूक सेवा दस्तुरी येथील अमन लॉज रेल्वेच्या स्टेशनपर्यंत यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
माथेरान : माथेरानमध्ये वाहतुकीची समस्या गंभीर आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना महागाईचा सामना करावा लागतो. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू स्वस्तात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मालवाहतूक सेवा दस्तुरी येथील अमन लॉज रेल्वेच्या स्टेशनपर्यंत यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाक्यावर सर्वच प्रकारची मालवाहतूक टेम्पोमधून होते. यात जीवनावश्यक वस्तूंबरोबरच बांधकाम साहित्याचाही समावेश आहे. तेथून पुढे गावात अथवा कुठेही दूरवर असणाऱ्या हॉटेल्स, बंगले याठिकाणी मालवाहू घोड्यावर आणि मानवचलित हातगाडीच्या साहाय्याने केली जाते. हातगाडी ओढणाºया श्रमिकांना अत्यंत अवघड परिस्थितीत खराब रस्त्यातून हातगाडी खेचावी लागते. त्यामुळे मालवाहतुकीसाठी अधिक किंमत मोजावी लागते. याचा भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागतो. सध्या अमन लॉज रेल्वे स्टेशनपासून नियमितपणे शटल सेवा सुरू आहे. त्यामध्ये एक मालवाहू बोगी उपलब्ध असते. यातून मोठ्या प्रमाणात माल माथेरानच्या मुख्य भागापर्यंत येऊ शकतो. त्यामुळे वाजवी दरात वस्तूंची विक्र ी दुकानदाराने करणे आवश्यक आहे, अन्यथा मालवाहतुकीवर होणारा खर्च दुकानदार ग्राहकांकडून वसूल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालवाहतुकीसाठी असलेल्या बोगीच्या फेºया वाढविल्यास स्थानिकांचा फायदा होईल, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
माथेरानमध्ये मालवाहतुकीची समस्या असल्याने सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळेच वाढीव दराने वस्तू खरेदी कराव्या लागतात. निदान जीवनावश्यक वस्तू माफक दरात उपलब्ध होण्यासाठी दस्तुरीपासून जी घोड्यावर अथवा हातगाडीमधून मालाची वाहतूक केली जात आहे त्यामुळे वस्तूंची खरेदी करताना जादा पैसे मोजावे लागतात. यावर उपाय म्हणून नगरपालिकेच्या येणाºया सर्वसाधारण सभेमध्ये अमन लॉजपर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्याबाबत विषय पत्रिकेवर विषय घेण्यात आला आहे.
- प्रसाद सावंत, गटनेते, माथेरान नगरपालिका