शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

माथेरानचे व्यापारी समस्यांच्या विळख्यात; बैठकीत व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 1:11 AM

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य ओळखून फेडरेशनच्या वतीने सर्व व्यापारीवर्गाला सुरक्षेच्या दृष्टीने सूचनादेखील करण्यात आल्या

कर्जत : माथेरानमधील व्यापाऱ्यांनी राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीमुळे व्यवसायात आलेली मंदी, फेरीवाल्यांचे व्यवसायावर होत असलेले अतिक्रमण आणि बाहेरील घोडेचालकांनी पर्यटकांची चालवलेली फसवणूक अशा अनेक समस्यांवर आपली नाराजी व्यक्त केली. माथेरानमध्ये आयोजित केलेल्या व्यापारी फेडरेशनच्या बैठकीत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

कोरोना परिस्थितीत माथेरानमध्ये मंदावलेला व्यवसाय यावर विचारमंथन करण्यासाठी व्यापारी फेडरेशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरात फेरीवाल्यांची वाढती संख्या व्यापाऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. दोन-दोन दिवस दुकानातून मालाची विक्री होत नाही. त्यात वीज बिल, पाणी बिल, मालमत्ता कर तसेच अन्न व औषधे परवाने शुल्क शासनाला भरत असताना व्यवसाय होत नाही. मात्र राजरोसपणे सर्व नियमांची पायमल्ली करून राजकीय आश्रय देऊन फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. 

या संदर्भात स्थानिक प्रशासन तसेच येथील राज्यकर्त्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली गेली. याशिवाय पर्यटकांशी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना नेटवर्कच्या समस्येमुळे व्यवसायात मोठ्या प्रमाणात घट होत आहे, असेदेखील व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.पर्यटक आणि घोडे हे माथेरानमधील प्रमुख अर्थकारणाची साधने आहेत, मात्र बाहेरील घोडे चालकांकडून पर्यटकांची फसवणूक होत असल्याची चर्चा आहे. येत्या काळात आपल्या उदरनिर्वाहासाठी तसेच माथेरानचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व्यापारीवर्गाला रस्त्यावर उतरून लढा देण्याची तयारी करावी लागेल, अशा प्रकारच्या तीव्र भावना या वेळी उमटताना दिसल्या.

राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे गांभीर्य ओळखून फेडरेशनच्या वतीने सर्व व्यापारीवर्गाला सुरक्षेच्या दृष्टीने सूचनादेखील करण्यात आल्या तसेच माथेरानबाहेरील व्यक्तीस आपले दुकान भाड्याने देण्याचे झाल्यास महाबळेश्वर पॅटर्न राबविण्याचा निर्णय  घेतला. हा निर्णय घेताना दुकान मालकाने भाडेकरूसोबतचा आपला व्यवहार व्यापारी फेडरेशनच्या निदर्शनास आणणे बंधनकारक आहे. भाडेकरूकडून एकदाच ठरावीक रक्कम फेडरेशनकडे  जमा करणेदेखील तेवढेच आवश्यक असणार आहे. व्यापारी फेडरेशनमध्ये मालकाशिवाय भाडेकरूला कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही, असाही सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

राजेश चौधरी यांची व्यापारी संघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड येत्या काळात पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्यांशी दोन हात करण्यासाठी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवावे, असे आवाहन अध्यक्ष राजेश चौधरी यांनी केले. त्यानुसार चौधरी यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत चंद्रकांत जाधव, अनंता शेलार, ज्ञानेश्वर बागडे, मनोज जांभळे, राजेश शहा, गिरीश पवार, चंद्रकांत काळे, अवधूत येरफुल्ले, हेमंत पवार, पप्पू खान, किरण जाधव, रामलाल खेर, शैलेश भोसले, प्रतीक ठक्कर यांचाही समावेश आहे, तर महिलावर्गाकडून जयश्री मालुसरे, जयश्री रामाणे यांची निवड करण्यात आहे.येत्या काळात पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्यांशी दोन हात करण्यासाठी आपल्यातील मतभेद बाजूला ठेवावे, असे आवाहन अध्यक्ष राजेश चौधरी यांनी केले. त्यानुसार चौधरी यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीत चंद्रकांत जाधव, अनंता शेलार, ज्ञानेश्वर बागडे, मनोज जांभळे, राजेश शहा, गिरीश पवार, चंद्रकांत काळे, अवधूत येरफुल्ले, हेमंत पवार, पप्पू खान, किरण जाधव, रामलाल खेर, शैलेश भोसले, प्रतीक ठक्कर यांचाही समावेश आहे, तर महिलावर्गाकडून जयश्री मालुसरे, जयश्री रामाणे यांची निवड करण्यात आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान