पोलादपूर येथे सर्वाधिक पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 03:56 AM2017-07-20T03:56:14+5:302017-07-20T03:56:14+5:30

जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद पोलादपूर येथे १७६ मि.मी. झाली आहे. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Maximum rainfall recorded in Poladapur | पोलादपूर येथे सर्वाधिक पावसाची नोंद

पोलादपूर येथे सर्वाधिक पावसाची नोंद

Next

- विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जिल्ह्यात बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत सर्वाधिक पावसाची नोंद पोलादपूर येथे १७६ मि.मी. झाली आहे. संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
श्रीवर्धन येथे १४२ मि.मी. पावसाची नोंद झाली, कर्जत ११७.२०, अलिबाग ११०, पेण ८२.२०, मुरु ड १३४, पनवेल ८२.४०, उरण ७०, खालापूर १०५, माणगाव १२०, रोहा ९३, सुधागड ९६.३३, तळा ९०, महाड १२१,म्हसळा १२३.२०, माथेरान १०३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २४ तासांतील जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान ११०.३३ मि.मी. आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात आगामी ४८ तासांकरिता अतिवृष्टीचा इशारा बुधवारी दिला आहे. या कालावधीत समुद्रही खवळलेल्या स्थितीत राहणार आहे. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्या. अतिवृष्टीला सामोरे जाण्यासाठी बचाव पथके, साहित्य, रुग्ण्वाहिका आदी सुविधा सज्ज ठेवाव्यात. नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत. सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रवाहाच्या मार्गातील अडथळे दूर करावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात ०२१४१-२२२११८ / २२२०९७/ २२२३२२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्तीकालीन कार्य कक्षातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Maximum rainfall recorded in Poladapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.