वाहतुकीच्या शिस्तीसाठी उपाय
By Admin | Published: February 19, 2017 03:54 AM2017-02-19T03:54:23+5:302017-02-19T03:54:23+5:30
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रत्येक वे मध्ये तीन लेन असून, यापैकी जड अवजड वाहने डाव्या लेनने न जाता मधल्या व उजव्या लेनमधून जात असल्याने व लेनची
अलिबाग : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रत्येक वे मध्ये तीन लेन असून, यापैकी जड अवजड वाहने डाव्या लेनने न जाता मधल्या व उजव्या लेनमधून जात असल्याने व लेनची शिस्त पाळण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच वाहनचालकाने बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे वाहतूककोंडीचे प्रमाण वाढत आहे. यावर मात करण्याकरिता वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक आर. के. पद्मनाभन यांनी वाहन कायद्यान्वये जड-अवजड व हलक्या वाहनांसाठी लेन निश्चिती लागू केली आहे. तसेच वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रत्येक वेमधील जड-अवजड वाहनांसाठी सर्वात डावीकडे लेन निश्चित करण्यासाठी मोटार वाहन कायदा १९८८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधीक्षक महामार्ग परीक्षेत्र ठाणे व पुणे यांनी सुचविल्याप्रमाणे रायगड व पुणे जिल्ह्याच्या हद्दीमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर जड, अवजड व हलक्या वाहनांच्या वाहतुकीसंदर्भात लेन कटिंग निर्बंधाबाबतच्या अधिसूचनेत अंशत:बदल करून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
बोर्ड, चिन्हे, फलक सूचना व तत्सम योग्य ठिकाणी लावणेबाबतची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकासमहामंडळ यांनी करावी असे आदेश देऊन वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांना आता कारवाई करता येणार असल्याचे सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
टोल तिकिटावर
अटी व शर्तीची नोंद
जड-अवजड हलक्या वाहनांसाठी प्रत्येक वेच्या (मुंबई व पुणे बाऊंड) अनुक्र मे डावी व मधली लेन निश्चित झाल्याबाबत व उजवी लेन ही हलक्या वाहनाच्या ओव्हर टेकिंगसाठी राखीव म्हणून निश्चित केल्याबाबत टोल तिकिटावर अटी व शर्ती म्हणून नमूद करावी. असे आदेशही देण्यात आले आहेत. या निर्बंधात अत्यावश्यक सेवा, व्हीआयपी यांना वगळण्यात आले आहे.