शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

यांत्रिक युगात बैलगाडीचे अस्तित्व धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 11:44 PM

खिल्लारी जोडीही दुर्मीळ; ग्रामीण भागातील पशुधन नष्ट होण्याची भीती

- विनोद भोईर 

पाली : सुधागड तालुका व रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात व इतरत्र शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. अशातच शेतीशी निगडित असे वाहतुकीचे महत्त्वाचे साधन असलेली बैलगाडी शेतकऱ्यांसाठी मोलाची आहे. मात्र, बदलत्या तंत्रयुक्त व यांत्रिकीकरणाच्या काळात ग्रामीण भागातून बैलगाड्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. याबरोबरच घराघरांत दिसणारी सर्जा-राजाची खिल्लारी जोडीही दुर्मीळ झाली आहे.

देशी जनावरांबाबत सरकारची अनास्था दिसून येत आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदी व सततचा दुष्काळ यामुळे खिलार गाय, बैल नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकूणच दोन दशकांपासून पशुधन नष्ट होत असल्याची आकडेवारी समोर येत असून, पशुधन वाचविण्याचीजबाबदारी आता शेतकºयाबरोबरच पर्यावरणप्रेमी व नागरिकांवर आली आहे. एकेकाळी बैलगाड्यांची सफर म्हणजे जणू हवाई सफरीचा आनंद मिळायचा.

शेत, शिवारासह दुर्गम, डोंगराळ भाग, तसेच नागमोडी वळणावरून खडकाळ चिखल मातीच्या रस्त्यावरून सुसाट धावणाºया बैलगाड्या काळाच्या ओघात नजरेस पडणे, दुर्मीळ झाल्या आहेत. काही वर्षांपूर्वी रस्त्यांचा विकास झाला नव्हता, त्या वेळेस बैलगाडी हे दळणवळणाचे व वाहतुकीचे मुख्य साधन मानले जायचे. इतर वाहनांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच होती.

एखादे वाहन गाव-खेड्यापाड्यात दाखल झाले तर ते बघण्यासाठी गर्दी जमायची. अशा काळात बैलगाडीला महत्त्वाचे स्थान होते. त्यामुळे ज्याच्या घरात बैलगाडी त्या घराला प्रतिष्ठा मिळत असे. विशिष्ट कार्यक्रम सोहळ्यात बैलगाडीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. नवरदेवाची मिरवणूक, जयंती असो की पालखी सोहळा, बैलगाडीचाच वापर होत असे. शेतीसाठी आवश्यक साहित्य बाजारातून आणणे, तसेच धान्य खरेदी-विक्री करणे, या कामात बैलगाडीचा मोठा वापर होत असे.

बैलगाडी बनविण्यासाठी साधारणत: दहा ते बारा हजार रुपये खर्च व्हायचा. यामध्ये कारागीर व सुताराला मजुरीदेखील मिळायची. शेतकºयाच्या मागणीनुसार लाकडाच्या वापराने सुबक, मजबूत व कलाकुसर करून बैलगाड्या बनविल्या जायच्या. अशा बैलगाडीतून जत्रा, बाजार व दूरवरचा फेरफटका म्हणजे आगळी वेगळी पर्वणीच. त्यानंतर लोखंडी बैलगाड्या बनविण्यास सुरुवात झाली. रस्त्यांचे जाळे वाढल्याने शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर, रिक्षा, टॅम्पो व इतर मालवाहतुकीची साधने आल्याने बैलगाडी काळाच्या ओघात मागे पडली.प्रोत्साहानासाठी विशेष प्रयत्न व्हावेत

कालांतराने येणाºया पिढीला ज्याप्रमाणे पशूपक्षी व प्राणी पुस्तकात पाहवे लागतात. त्याप्रमाणे बैलगाडीही पुस्तकात पाहवी लागेल, असे दिसते. त्यामुळे शासनाने गाय, बैल व अन्य जनावरांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच रोडावलेल्या बैलांची व बैलगाड्यांची संख्या वाढविण्यासाठी तसेच शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.वेगवान वाहनांच्या वापराने जलद वाहतूक होऊ लागली आणि हळूहळू शेतीच्या कामासह दळणवळणाच्या कामातही बैलगाडीचा वापर कमी होत गेला. आता रस्त्यावर कधीतरी एखादी बैलगाडी दिसते. त्यामुळे शहरातून गावाकडे येणारी बच्चेकंपनी कुतूहलाने बैलगाडी सफरीचा आनंद घेताना दिसतात. याशिवाय काही ठिकाणी घोडेस्वारी, उंटाच्या सफारीप्रमाणे बफोलो राइडची सुविधाही उपलब्ध केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगड