जेएनयूच्या विद्यार्थ्यांबाबत माध्यमांची भूमिका अयोग्य

By admin | Published: April 17, 2016 01:17 AM2016-04-17T01:17:09+5:302016-04-17T01:17:09+5:30

विविध विद्यार्थी संघटनांची सक्रियता लाभलेल्या दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांबाबत केवळ प्रसारमाध्यमांच्या आधारे मते बनविणे अत्यंत अयोग्य असल्याचे प्रतिपादन

Media's role in JNU's students is inappropriate | जेएनयूच्या विद्यार्थ्यांबाबत माध्यमांची भूमिका अयोग्य

जेएनयूच्या विद्यार्थ्यांबाबत माध्यमांची भूमिका अयोग्य

Next

महाड : विविध विद्यार्थी संघटनांची सक्रियता लाभलेल्या दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांबाबत केवळ प्रसारमाध्यमांच्या आधारे मते बनविणे अत्यंत अयोग्य असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.
पोलादपूर येथील सिद्धगिरी शिक्षण संस्थेच्या यशवंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या गंगाबाई गांधी सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी मेधा पाटकर या शिक्षण व जीवन शाळा या विषयवर चर्चासत्रात बोलत होत्या. जेएनयूच्या निमंत्रणावरून त्या ठिकाणी आपण व्याख्यानासाठी गेले असता, व्याख्यानानंतरही सामाजिक कार्याप्रती प्रचंड उत्कंठा दाखवणारे विद्यार्थीही कोण्या अफजल गुरूबाबत काय म्हणाले, याबाबत माध्यमांतून प्रसारित होणारे प्रसारण ऐकून हे वेगळ्या प्रवृत्तींचे आहेत, असे मत होत नसल्याचेही पाटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाटकर म्हणाल्या, की महाराष्ट्रात अण्णासाहेब शिंदे, शिक्षण महर्षी कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी शिक्षण संतांनी जे शैक्षणिक कार्य केले, ती भावना आज समाजात कितपत टिकून आहे, हे आपण जाणतो. नवखासगीकरण, नवव्यापारीकरण या संकल्पना पूर्वीच्या खासगीकरण आणि व्यापारीकरणापेक्षा अधिक तीव्र स्वरूपाच्या झाल्यास ही बाब चिंतेची आहे.
शिक्षण देणे शासनाचेच कर्तव्य आणि शिक्षण घेणे हा नागरिकांचा अधिकार आहे. पण शासनाला आपल्या कर्तव्याची जाणीव किती आहे, याबाबत अनेक शाळा या कागदोपत्रीच असल्याचा गौप्यस्फोट पाटकर यांनी यावेळी केला.
आजही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असताना सर्व शिक्षा अभियानाचा गौरव करणे अयोग्य असल्याचेही पाटकर यांनी सांगितले. विविध आर्थिक, सामाजिक अडचणी सहन करताना देशातील विद्यार्थ्यांना एकावन्न प्रकारचा जातीयवाद भोगावा लागत असल्याचेही सर्वेक्षणाअंती आज आढळून आलेले आहे, अशी माहिती मेधा पाटकर यांनी यावेळी दिली.

Web Title: Media's role in JNU's students is inappropriate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.