- अरुण जंगम
म्हसळा : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर केंद्र व राज्य शासनामार्फत प्रयत्न केले जातात. सर्वसामान्यांपर्यंत पारदर्शक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्रिस्तरीय आरोग्य सेवांच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित होत असतात, त्यामध्ये आपत्कालीन वैद्यकीय सेवा, आयुष्यमान भारत, जिल्हा रु ग्णालय, केमोथेरेपी सुविधा, फिरते वैयक्तिक उपचार केंद्र असे विविध उपक्रम शासन राबवित आहे. रायगड जिल्ह्याच्या आरोग्याचा विचार करता, जिल्ह्यात ठिकठिकाणी सामान्य रुग्णालय, ग्रामीण रु ग्णालय तर काही ठिकाणी नगरपालिका दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविल्या जातात, यासाठी वैयक्तिक अधिकारी गट अ व वर्ग २ अशा तज्ज्ञ मंडळींमार्फत शासन सेवा पुरवित असते. त्यापैकी म्हसळा तालुक्यात मेंदडी, खामगाव व म्हसळा या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पाभरे येथे जिल्हा परिषदेचा दवाखाना असून यांच्या मार्फत गोरगरिबांपर्यंत मोफत व अगदी माफक दरात वैद्यकीय सेवा दिली जाते. आकृतिबंधाप्रमाणे तालुक्यासाठी सहा वैद्यकीय अधिकारी आवश्यक असताना केवळ एक अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे म्हसळा तालुक्यात वैद्यकीय अधिकाºयांची पाच पदे रिक्त आहेत.
म्हसळ्या सारख्या ग्रामीण व डोंगराळ भागामध्ये वैद्यकीय अधिकाºयांची कमतरता असल्याने संपूर्ण भागातील नागरिक नाइलाजास्तव महागडी खासगी सेवा घेत आहेत. याचाच फायदा बोगस डॉक्टरांनी घेतल्याने म्हसळ्यासारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील जनता या बोगस डॉक्टरांकडून आपला इलाज करून घेत आहेत. या सर्व बाबींना जिल्हा आरोग्य विभाग जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना उतरती कळा लागल्याने नागरिक पर्यायी तालुक्यातील ग्रामीण रु ग्णालयामध्ये उपचाराकरिता येत आहेत. म्हसळा तालुक्यात २०१४ मध्ये ग्रामीण रु ग्णालयाची इमारत नागरिकांच्या सेवेसाठी बांधण्यात आली. मात्र, म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाची परिस्थिती सर्वात वाईट असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण रु ग्णालयासाठी तीन वैयक्तिक अधिकारी मंजूर आहेत. एकाही पदावर कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमला नसल्याचे समजते.
अनेक वर्षे अर्ज विनवण्या करून म्हसळा तालुक्यासाठी ग्रामीण रु ग्णालय मिळाले. ३० खाटांचे व सुमारे दोन कोटी खर्च केलेल्या यारु ग्णालयाचे उद्घाटन २५ मे २०१४ ला झाले. आज तब्बल पाच वर्षे झाली, तरी म्हसळा ग्रामीण रु ग्णालयाला कायमस्वरूपी अधीक्षक अगर वैद्यकीय अधिकारी शासन देऊ शकले नाही.ग्रामीण रु ग्णालयात नसलेली सामग्रीच्रु ग्णालयाला आवश्यक असणारा विद्युतपुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी थ्री फेज कनेक्शन व स्वतंत्र डी.पी.ची आवश्यकता आहे. एक्स-रे, ई.सी.जी. मशिन, बी.पी.आॅपरेटर, रक्त नमुने चेक करायचे अत्याधुनिक मशिन, आॅक्सिजन सिलिंडर, १०८ व १०२ रु ग्णवाहिका, जनरेटर, डीप फ्रिज, वॉशिंग मशिन व अन्य.रुग्ण कल्याण समितीची स्थापना नाही१ग्रामीण रु ग्णालयाला कायमस्वरूपी अधीक्षक अगर वैद्यकीय अधिकारी नसल्याने ग्रामीण रु ग्णालयात अद्यापही रु ग्ण कल्याण समितीची स्थापना केली नाही; परंतु बाह्य रु ग्ण विभाग यांच्यामधील निधीचा मनमानी खर्च मात्र सुरू असल्याचे कळते, नगरपंचायत-नगरपालिका क्षेत्रांत कुटुंब कल्याण आरोग्य कार्यक्र माची जनजागृती, स्थानिक सहभाग व सर्वेक्षण यासाठी ए.एन.एम.ची नेमणूक करून घेणे अद्यापही झाले नाही.२गरोदर माता, बाळंतपण निधी योग्य प्रकारे खर्च होत आहे का? हासुद्धा चर्चेचा विषय आहे. यासाठी रु ग्ण कल्याण समितीची आवश्यकता आहे. मुख्यत: म्हणजे तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे बोर्लीपंचतन वैद्यकीय अधिकारी, म्हसळा तालुका वैद्यकीय अधिकारी, तसेच म्हसळा वैद्यकीय अधिकारी ही पदे असल्याने एकाच व्यक्तीने एवढा अतिरिक्त भार संभाळणे अशक्य आहे. मेंदडी प्रा.आ. केंद्र दोन्हीही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त, खामगाव प्रा.आ. केंद्र एक वैद्यकीय अधिकारी पद रिक्त, म्हसळा प्रा.आ. केंद्र दोन्हीही वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत.