शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

नावीन्यपूर्ण योजनेतील विकासकामांना प्राधान्य, जिल्हा नियोजन समितीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 2:53 AM

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २४७ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी २४७ कोटी ५६ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या तळागाळातील सर्वांगीण विकासाला गती येणार असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली. आदिती तटकरे या पालकमंत्री झाल्यानंतरची त्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पहिलीच बैठक पार पडली. त्याप्रसंगी त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.कोकण विभागात मंजूर निधी खर्च करण्यात रायगड जिल्हा आघाडीवर आहे. त्या दृष्टीने फेब्रुवारी महिन्याअखेर शंभर टक्के निधी खर्च होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देशही सर्व यंत्रणेच्या प्रमुखांना त्यांनी दिले. २०२०-२१ या वर्षाकरीता २४७ कोटी ५६ लाख रुपयांबरोबरच ४५ कोटी रुपयांच्या वाढीव निधीसाठीही सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या काही वर्षांमध्ये रस्ते, नाले, पाणीपुरवठा असे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. आता नावीन्यपूर्ण योजनेतून तब्बल एक हजार २०० स्मशानभूमींसाठी शेड बांधणे यांना प्राधान्य देण्यात येणार आहे, असे तटकरे यांनी सांगितेले.त्याचप्रमाणे, आंगणवाडीच्या दुरुस्तीसाठी पूर्वी एक लाख रुपयांचा निधी देण्यात येत होता. त्यामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे.मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या वाढत आहे. त्या कचºयाचे व्यवस्थापन करण्यासाठी अशा ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगितले. नगरपंचायतींना सीसीटीव्ही बसविणे, तसेच सरकारी माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींची गळती रोखण्यासाठी आठ ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सायकल देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे सहा हजार विद्यार्थिनींचा समावेश करण्याचा विचार असल्याचेही तटकरे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव उपस्थित होते.अर्थमंत्र्यांकडे निधीची मागणीजिल्हा सरकारी रुग्णालयातून मोठ्या संख्येने रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईच्या सरकारी रुग्णालयात न्यावे लागते. रस्ते मार्गानी जाणे अतिशय खर्चिक, तसेच वेळेचाही अपव्यय होत असतो.रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी वेळ अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे मांडवा ते भाऊचा धक्का अशी समुद्रमार्गे बोट अ‍ॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची मागणी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.बोट अ‍ॅम्ब्युलन्समध्ये असणा-या सुविधाया अ‍ॅम्ब्युलन्स बोटीमध्ये अत्याधुनिक सुविधांबरोबरच वैद्यकीय अधिकारी, मेडिकल रूम, मेडिकल स्टोर, आॅक्सिजन सिलिंडर, पिण्याचे पाणी, जनरल स्टोर, वॉश रूम, टॉयलेटची सुविधा राहणार आहे. त्याचप्रमाणे, ही बोट संपूर्ण वातानुकूलित असणार आहे.किमान सात व्यक्तींची सोय यामध्ये आहे. या बोटीवर जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइसही बसविण्यात येणार आहेत, तसेच जनरेटची सुविधाही देण्यात येणार आहे. या बोट अ‍ॅम्ब्युलन्सला १०८ अ‍ॅम्ब्युलन्सची जोड देण्यात येणार असल्याने कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटणार आहे.जिल्हा रु ग्णालयातून मुंबईत पाठविलेले रु ग्णसरकारी रु ग्णालयातून मुंबई येथे अधिक उपचारासाठी दिवसाला किमान चार अत्यवस्थ रु ग्ण पाठविले जातात. २०१२-१३ या कालावधीत १,१७६ रु ग्ण मुंबईतील रु ग्णालयात नेले होते.२०१३-१४ या कालावधीत १,२२४, २०१४-१५ मध्ये १,२६२, २०१५-१६ मध्ये १,४१७ आणि २०१६-१७ मध्ये १,२४३, २०१७-१८ मध्ये १,३५४ तर २०१८-१९ या कालावधीत १,२७८ असे एकूण आठ हजार ९५४ रु ग्णांचा समावेश होता.गेल्या काही वर्षामध्ये रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसते. 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबई