- जयंत धुळप
रायगड - पर्यावरण व वन मंत्नालयाच्या अधिसुचनेद्वारे गठित माथेरान ईको सेन्सिटिव्ह झोन नियंत्नण समीतीची बैठक येत्या ७ एप्रिल रोजी माथेरान येथे आयोजित करण्यात आली आहे. या समीतीकडे करावयाच्या तक्रारी, तसेच या क्षेत्नात करावयाच्या विकासकामांचे प्रस्ताव दिलेल्या मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवशी यांनी केले आहे.
रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण ८९ गावांचा प्रदेश संवेदनशील
भारत सरकारच्या पर्यावरण व वन विभागाच्या दि.४ फेब्रुवारी २००३च्या अधिसूचनेन्वये रायगड व ठाणे जिल्हयातील एकूण ८९ (काही पूर्ण व काही अंशत:) गावांचा प्रदेश संवेदनशील क्षेत्न म्हणून घोषित करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक पुर्ण व १९ अंशत: अशी एकूण २० ,खालापूर तालुक्यातील अंशत: १०,पनवेल तालुक्यातील पुर्ण दोन व अंशत: ३८ अशी एकूण-४०,आणि ठाणे जिल्हयातील अंबरनाथ तालुक्यातील अंशत: १९ अशा एकूण ८९ गावांचा प्रदेश समाविष्ट आहे. समाविष्ट गावांची यादी संबंधित तहसिलदारांकडे पहावयास उपलब्ध आहे.
वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय सनियंत्नण समीती
भारत सरकारच्या पर्यावरण विभागाच्या आदेशान्वये, सेवा निवृत्त सनदी अधिकारी वासुदेव जी.गोरडे यांच्या अध्यक्षतेखाली एकूण नऊ सदस्यांची सनियंत्नण समीती दोन वर्षाकरीता गठीत करण्यात आली असून रायगड जिल्हाधिकारी हे या समीतीचे सदस्य सचिव आहेत. या समीतीची दुसरी बैठक ७ एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता माथेरान मधील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विश्रमगृहात आयोजित करण्यांत आली आहे.
विकास प्रस्ताव बैठकीच्या पाच दिवस आधी पोहोचणे आवश्यक
या गावामधील संवेदनशील क्षेत्न म्हणून घोषित केलेल्या प्रदेशातील सर्व विकास विषयक कामे, सर्व बांधकामे व बांधकामाचे नुतनीकरण, संवेदनशील क्षेत्नात करावयाचे कोणतेही खाणकाम, तसेच भूगर्भातील पाण्याची विक्री या कामांना सनियंत्नण समीतीच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता आहे. या समीतीकडे कोणास काही तक्रारी करावयाच्या असतील तर त्यांनी त्यांचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांचेकडे सपूर्द करावेत.असे तक्रार अर्ज सनियंत्नण समीतीच्या बैठकीत विचारार्थ घेतले जातील. तसेच विकास करावयाच्या कामासाठी सनियंत्नण समीतीची मान्यता घेण्याच्या दृष्टीने आपले प्रस्ताव १० प्रतीत जिल्हाधिकारी रायगड अलिबाग तथा सदस्य सचिव सनियंत्नण समीती यांच्याकडे सनियंत्नण समीतीच्या बैठकीपूर्वी किमान पाच दिवस अगोदर पाठवावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवशी यांनी केले आहे.