पाली : सुधागड तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक बुधवारी पाली तहसील कार्यालयाच्य हीरकणी कक्षात नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश मपारा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. कृषी खात्याच्या प्रश्नावर चर्चा करताना शेतक-यांच्या नुकसानभरपाईची रक्कम जमा झाल्याबाबत शेतकरी कृषी खात्याच्या अधिकाºयांना विचारणा करण्यास गेले असता शेतकºयांना आपली रक्कम बँकेत जमा झाल्याचे सांगितले जाते; परंतु प्रत्यक्षात बँकेत रक्कम जमा नसते. शेतकºयाला कृषी कार्यालय ते बँक असे हेलपाटे मारून त्रास सहन करावा लागत असल्याने यापुढे असा प्रकार होऊ नये, याची दक्षता कृषी खात्याने घ्यावी, असे अध्यक्षांसह सदस्यांनी कृषी अधिकारी रोकडे यांना सूचित केले.या बैठकीसाठी सभापती साक्षी दिघे, राजेंद्र राऊत, अशोक मेहता, किसन उमटे, पंढरीनाथ घोसालकर, निहारिका शिर्के , तहसीलदार बी. एन. निंबाळकर यांच्यासह कृषी, पंचायत समिती, वने, आरोग्य, जि. प. बांधकाम, सामाजिक वनीकरण, भूमिअभिलेख, पोलीस, पुरवठा, महसूल, ग्रामीण पाणीपुरवठा आदी विभागातील अधिकारी उपस्थित होते. मात्र, ज्या विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित नव्हते त्यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त करून या अधिकाºयांना समज देण्याची सूचना केली.पाली बसस्थानकाची गंभीर समस्या असून, त्याकडे एसटी महामंडळाच्या अधिकाºयांचे दुर्लक्ष आहे. बसस्थानकाची इमारत जीर्ण झाली असून, ही इमारत पडून अपघात झाल्यानंतर अधिकारी लक्ष देतील का? असा संताप या बैठकीत व्यक्त करण्यात आला. एसटी महामंडळाचा प्रतिनिधी या बैठकीत हजर नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. ही बैठक सुरू होण्याअगोदर या समितीचे सचिव तथा तहसीलदार निंबाळकर यांनी अध्यक्षांसह सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ न देता प्रत्येकी एक वृक्ष देऊन स्वागत केले.तसेच तालुक्यातील वीज, पाणी, आरोग्य आदी महत्त्वाच्या विषयांवर गंभीर चर्चा करण्यात आली. या बैठकीस भाजपाचे सरचिटणीस शिरीष सकपाळ, अरुण खंडागळे, सुशील थळे, गौसखान पठाण, संजय घोसाळकर, प्रमोद मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
शेतक-यांनी मांडल्या बैठकीत समस्या, सुधागड समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 2:52 AM