श्रीवर्धनमध्ये भरपावसात सुनील तटकरेंची सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 11:24 PM2019-10-19T23:24:58+5:302019-10-19T23:25:08+5:30
विरोधकांवर टीकास्त्र, रोहा येथे झाली आघाडीच्या प्रचाराची सांगता
माणगाव: विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शनिवारी शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्षांनी सकाळपासून जोरदार प्रचाराला सुरुवात के ली होती. श्रीवर्धन विधानसभेच्या आघाडीच्या उमेदवार अदिती तटकरे यांच्या प्रचारार्थ खा. सुनील तटकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी विरोधकांवर टीका के ली.रोहा येथील राम मारुती चौकात झालेल्या सभेने प्रचाराचा शेवट खा. तटकरे यांनी केला.
श्रीवर्धनमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे ही प्रचारसभा भरपावसामध्ये झाली. या वेळी माझ्यावर कोणतेही दोषारोप नाहीत. मला लोकसभेमध्ये रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील २२ लाख जनतेने स्वीकारून निवडून दिले आहे. तेव्हा या वेळी ही जनतेचा आपल्यावर विश्वास असल्याचे स्पष्ट के ले. आमची बांधिलकी येथील जनतेसोबत सदैव राहिली आहे, असे ते म्हणाले. तर रोहा येथील सभेत प्रदेश महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. महागाई, बेरोजगारी आदी सर्वच बाबतीत या सरकारने जनतेला दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण केली नाहीत.
जनतेला निव्वळ फसवण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप त्यांनी के ला.या वेळी पावसाचे सावट असूनही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या रोहेकरांना पाहून अदिती तटकरे भावूक झालेल्या दिसून आल्या. या वेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, ज्येष्ठ नेते व्ही. टी. देशमुख, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.