आंबेत पुलाच्या पर्यायी व्यवस्थेसाठी बैठक घेणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 11:56 PM2020-01-14T23:56:08+5:302020-01-14T23:56:15+5:30
आदिती तटकरे यांनी केली पाहणी
म्हसळा : रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून पूल जड वाहतुकीस बंद आहे, त्यामुळे रत्नागिरी-रायगड जिल्ह्यातील दळणवळणावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्यक्ष या पुलाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून याबाबतचा आढावा घेऊन नागरिक, प्रवाशांच्या अडचणी आणि गैरसोय दूर करून लवकरच पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. यासाठी आंबेत-म्हाप्रोळ दरम्यान फेरीबोट अथवा जंगलजेटीची तात्पुरती व्यवस्था करण्याबाबत मेरीटाइम बोर्डाची बैठक तातडीने मंत्रालयात आयोजित केली असून, पर्यायी व्यवस्था करण्याचे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले.
१० फेब्रुवारी २०२० पासून सर्व वाहनांसाठी आंबेत-म्हाप्रळ वाहतूक तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सूचित केले असून, या दरम्यान इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने परीक्षार्थींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होणार आहे, यामुळे लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी या प्रसंगी नागरिकांनी केली.
या वेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बहिर, उपअभियंता राऊत, तहसीलदार शरद गोसावी, सभापती उज्ज्वला सावंत, उपसभापती मधुकर गायकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर आदी मान्यवर उपस्थित होते. १० फेब्रुवारी २०२० पासून सर्व वाहनांसाठी आंबेत-म्हाप्रळ वाहतूक तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी सूचित केले .