नगरपंचायतीच्या सभेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:32 AM2018-02-21T01:32:48+5:302018-02-21T01:32:48+5:30
खालापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नैना प्रकल्पाविरोधात नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून निषेध करण्यात आला
वावोशी : खालापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नैना प्रकल्पाविरोधात नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून निषेध करण्यात आला. शेकापच्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुद्ध निषेध नोंदवित सभात्याग केला.
खालापूर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून ‘नैना’ प्रकल्पाचे वारे खालापुरात वाहत असून, खालापूर स्मार्ट सिटीसाठी नैनासोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानंतर ‘नैना’ प्रकल्पाचे खरे रूप नागरिक व शेतकºयांच्या समोर आले. या प्रकल्पास विरोध होण्यास सुरुवात झाली. खालापूर नगरपंचायतीकडून मागील दीड वर्ष तोंडी आश्वासनांच्या पलीकडे काही दिले गेले नसून, ‘नैना’ शेतकरी संघर्ष समिती व शिवसेना पक्षाचे नगरसेवक वारंवार नगराध्यक्षांकडे पत्रव्यवहार करून तोंडी चर्चा करून, ‘नैना’ प्रकल्पाविरोधात सर्वसाधारण सभेत विषय घेऊन नगरपंचायतीची भूमिका स्पष्ट व्हावी, म्हणून विनंती करूनही प्रत्येक वेळी आश्वासनांपलीकडे काहीही मिळाले नाही. तसेच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून सभेमध्ये मांडलेली मते, विषय व आक्षेप याची नोंद न घेता इतिवृत्तान्तामध्ये सर्वानुमते ठराव मंजूर, असे नमूद केले जाते. याबाबत लेखी तक्र ार करूनही वारंवार जाणून-बुजून पुनरावृत्ती केली जाते. तसेच १७ फे ब्रुवारीच्या सभेपूर्वी पत्रव्यवहार करून, ‘नैना’ प्रकल्पाबाबत विषयपत्रिकेवर विषय घेऊन त्यावर चर्चा होण्यासाठी शिवसेना पक्षाचे गटनेते व नगरसेवक व पहिल्यापासून या प्रकल्पास विरोध दर्शविणाºया नगरसेविका कांचन गव्हाणकर यांनी सभेच्या अध्यक्षांना विनंती अर्ज दिला. ‘नैना’ प्रकल्पाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी १७ फेब्रुवारीच्या सभेमध्ये विषय न घेतल्यामुळे, शिवसेना पक्षाचे विरोधी पक्षनेते दिलीप मणेर, धनंजय गावंड, बाळकृष्ण पाटील, अवधूत भुर्के, सुरेखा पवार व राष्ट्रवादीच्या नगरसेविका कांचन गव्हाणकर यांनी ही बाब लोकशाहीस धरून नसल्याने शेकापच्या नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरुद्ध निषेध नोंदवत सभात्याग केला.