इंजिनीअरिंग निकालाचा गोंधळ अद्यापही सुरूच

By admin | Published: August 6, 2014 01:12 AM2014-08-06T01:12:06+5:302014-08-06T01:12:06+5:30

मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर आठच्या चार अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे.

The mess of engineering results is still going on | इंजिनीअरिंग निकालाचा गोंधळ अद्यापही सुरूच

इंजिनीअरिंग निकालाचा गोंधळ अद्यापही सुरूच

Next
मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या इंजिनीअरिंग सेमिस्टर आठच्या चार अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे. या चार शाखांमधील परीक्षांतील अनेक विद्याथ्र्याच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन स्कॅन झाल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचा निकाल चुकीचा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. तर दुसरीकडे परीक्षा होऊन 65 दिवसांचा कालावधी उलटला तरी अनेक अभ्यासक्रमांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. यामुळे विद्यार्थी हवालदिल झाले असून इंजिनीअरिंगच्या निकालातील गोंधळ सुरूच राहिला आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षेनंतर 45 दिवसांच्या आत निकाल जाहीर करणो बंधनकारक आहे. इंजिनीअरिंगची परीक्षा होऊन 65 दिवसांचा कालावधी उलटला तरी आठव्या सेमिस्टरसह पहिल्या सेमिस्टरचाही निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्याथ्र्यानी मंगळवारी कालिना कॅम्पसमधील परीक्षा भवनात गर्दी केली होती.
विद्यापीठातील सूत्रंकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेमिस्टर आठच्या विद्याथ्र्याच्या उत्तरपत्रिका व्यवस्थित स्कॅन झाल्या नसल्याने अनेक विद्याथ्र्याना नापास 
करण्यात आले असल्याचा आरोप, विद्यापीठाचे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला आहे. उत्तरपत्रिका स्कॅन करण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले असून त्यांनी या निकालातही गोंधळ घातला आहे. त्यामुळे विद्यापीठाने विद्याथ्र्याच्या भवितव्याशी खेळ मांडला असून विद्यापीठाने उत्तरतपासणीची  पद्धत बदलावी, असे वैराळ यांनी सांगितले. या प्रकरणी मुंबई विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
 
च् जाहीर झालेल्या अभ्यासक्रमांच्या निकालात अनेकांचा  जाहीर झालेल्या अभ्यासक्रमांमधील अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्याने त्यांनीही विद्यापीठात धाव घेतली होती. त्यामुळे विद्यापीठात विद्याथ्र्याची एकच गर्दी झाली होती.

 

Web Title: The mess of engineering results is still going on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.