म्हसळा राज्यातील पहिला प्रगत तालुका
By admin | Published: January 28, 2017 02:56 AM2017-01-28T02:56:13+5:302017-01-28T02:56:13+5:30
महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी अध्यादेश काढून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास लिहिता- वाचता आले पाहिजे
म्हसळा : महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी अध्यादेश काढून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास लिहिता- वाचता आले पाहिजे, एकही मूल अप्रगत राहता कामा नये, प्रत्येक वर्ग आणि शाळा १०० टक्के प्रगत झाली पाहिजे, असे आवाहन केले.ते डायट संस्थेचे प्राचार्य डॉ.गजानन पाटील यांनी स्वीकारून रायगड जिल्हा शंभर टक्के प्रगत करण्याचे आवाहन स्वीकारले आणि ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत जिल्हा प्रगत न झाल्यास स्वत: नोकरीचा राजीनामा देण्याचा निर्धार केला. त्यापैकी म्हसळा तालुका शंभर टक्के प्रगत झाला असल्याची घोषणा प्रजासत्ताक दिनी करण्यात आली.
डॉ.गजानन पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची प्रगत महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन म्हसळा तालुका गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे, गटविकास अधिकारी नीलम गाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती यांनी जबाबदारी स्वीकारु न तालुका २६ जानेवारी २०१७ या भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हसळा तालुका राज्यातील पहिला प्रगत तालुका म्हणून घोषित केला. यापूर्वी तंबाखूमुक्त म्हसळा तालुका म्हणून लौकिक मिळाला असून राज्यात तो पायलट प्रोजेक्ट ठरला होता.वास्तविक पहाता म्हसळा हा रायगड जिल्ह्यातील सर्वात दुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून शासनमान्य आहे. दुर्गम व डोंगराळ असल्यामुळे शालेय शिक्षणाखेरीज दुसरी कोणतीही सोय तालुक्यात नाही. त्यात शिक्षण विभागाची सर्व महत्वाची पदे गेली कित्येक वर्षे रिक्त आहेत.त्यात विशेष म्हणजे तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, दोन्ही विस्तार अधिकारी, गटसमन्वयक, ओ.एस., पोषण आहार अधीक्षक, सात केंद्रप्रमुख पदे रिक्त असतानाही प्रभारी गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांनी एवढी मोठी जबाबदारी स्वीकारून तालुक्याच्या शिरपेचात एक फार मोठा मानाचा तुरा रोवल्यामुळे तालुक्याचे विशेष कौतुक होत आहे.
गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे यांनी हा उपक्र म यशस्वी व्हावा यासाठी अनेक क्रि याशील उपक्र म राबविले. या यशाबद्दल राज्याचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक मगर आदी मान्यवरांनी तालुक्याचे विशेष अभिनंदन केले.(वार्ताहर)