एमआयडीसीत ट्रॅक्टर जाळला
By admin | Published: March 21, 2017 02:00 AM2017-03-21T02:00:50+5:302017-03-21T02:00:50+5:30
मुंबई-पुण्यासारख्या महानगरातील गाड्या जाळण्याचे लोन महाड एमआयडीसीमधील नांगलवाडी गावापर्यंत येऊन पोहचले असल्याची
बिरवाडी : मुंबई-पुण्यासारख्या महानगरातील गाड्या जाळण्याचे लोन महाड एमआयडीसीमधील नांगलवाडी गावापर्यंत येऊन पोहचले असल्याची घटना २० मार्च रोजी पहाटे १ ते सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर महाड एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.
नांगलवाडी गावच्या हद्दीतील दिलीप तांबे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत उभा करून ठेवलेल्या ट्रॅक्टरला ( के ए ३३ पी २५४६) २० मार्च रोजी अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामुळे ट्रॅक्टरची सीट, ट्रॅक्टरचे स्टेअरिंग गेअर, रीडिंग मीटर, डिझेल, आॅइल, प्लास्टिक हूड जाळून नुकसान झाले असून शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेश नारायण देशमुख यांच्या कंपाउंडमधील लाकडे जाळून इतर वाहन जाळण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद ट्रॅक्टर चालक प्रकाश नागनुर (२८,मूळ रा. कर्नाटक सध्या रा. नांगलवाडी) यांनी दिली असून या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस एच.एच.डवले या करीत आहेत.