लोकमत न्यूज नेटवर्कमुरूड/आगरदांडा : तालुक्यात वादळाच्या पार्श्वभूमीवर मुरूड येथील महसूल कार्यालयाने जोरदार तयारी केली असून समुद्रकिनाºयाला असणारी गावे विहूर, कोर्लई, बोर्ली, राजपुरी, एकदरा, मुरूड शहर कोळीवाडा या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिला. मंगळवारी सायंकाळपासून समुद्रकिनारी असणारी कच्ची घरे, कौलारू घरे, पत्र्याच्या घरांत राहणाºया सर्व लोकांना निवारा शेडमध्ये राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी मंडळ अधिकारी विजय म्हापुस्कर हे तलाठ्यासोबत समुद्रकिनारी गावात फिरून सर्व नागरिकांची सोया निवारा शेडमध्ये करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. तालुक्यातील समुद्रकिनारी असणाºया नागरिकांची शासकीय शाळा, निवारा शेड व मोकळ्या जागेत राहण्याची व्यवस्था केली जात आहे.
याबाबत मुरूड तहसीलदार गमन गावीत व नायब तहसीलदार रवींद्र सानप यांनी नागरिकांना या वादळासंदर्भात माहिती होण्यासाठी तलाठी गावागावात जाऊन कशी दक्षता घ्यावयाची याबाबत कल्पना देत आहेत. तसेच यासाठी मशिदीमधूनसुद्धा जाहीर सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बुधवार हा दिवस नागरिकांसाठी जनता कर्फ्यू असून घरातून बाहेर पडू नये प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ज्या नागरिकांना निवारा शेडमध्ये हलवण्यात येणार आहे, त्यांनी आपल्या घरातील वीज, गॅस कनेक्शन व पाणी कनेक्शन बंद करावे.जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या सूचनाया चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रायगड जिल्ह्यामध्ये ५ जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच जिल्ह्यात सोसाट्याचे वारे वाहणार आहेत. समुद्र खवळलेला राहणार आहे. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सावधानता बाळगावी.किनारी भागातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी सतर्क राहावे. तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी शोध व बचाव साहित्य सुस्थितीत असल्याची खात्री करावी. कोणतीही दुर्घटना घडल्यास नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती द्या, अशा सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने के ल्या.