म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरेत स्थलांतरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 03:03 AM2018-08-18T03:03:03+5:302018-08-18T03:03:18+5:30

म्हसळा तालुका शहरात ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्याने येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सद्यस्थितीत बंद आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची रु ग्ण सेवा ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीत कार्यान्वित होती.

Migration to Mhasala Primary Health Center to pabhare | म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरेत स्थलांतरित करा

म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरेत स्थलांतरित करा

googlenewsNext

म्हसळा - तालुका शहरात ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित झाल्याने येथे कार्यरत असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र सद्यस्थितीत बंद आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची रु ग्ण सेवा ग्रामीण रुग्णालयाचे इमारतीत कार्यान्वित होती. गेल्या चार महिन्यांपासून येथे ग्रामीण रु ग्णालय कार्यान्वित झाल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्ण सेवा बंद पडली आहे.
आरोग्य केंद्र कायम जनतेच्या सेवेत रहावे म्हणून म्हसळ्यापासूनच पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि मोठी लोकवस्तीच्या पाभरे पंच क्रोशीत स्थलांतरित करावेत असा ठराव नुकताच म्हसळा रु ग्णकल्याण समितीचे तथा रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य बबन मनवे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या आढावा सभेत घेण्यात आला. सभेला समितीचे सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सूरज तडवी, समिती सदस्य डॉ.राऊत, माजी सरपंच रामदास रिकामे, सुरेश जैन, प्रकाश गाणेकर, फैसल गीते, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, विस्तार अधिकारी दत्तू हिंदोला, अंगणवाडी पर्यवेक्षिका रेणुका पाटील, कनिष्ठ सहाय्यक महेंद्र रहाटे, आरोग्य सहायिका कल्पना उकिर्डे आदी मान्यवर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. म्हसळा तालुक्यातील पाभरे जिल्हा परिषदेच्या गटात सुमारे १० हजार लोकवस्ती असून लागूनच तळा तालुक्यातील मजगाव, वाशी, कुंभला, वरल ही मोठ्या लोकवस्तीच्या गावांची बाजारपेठ म्हसळा आहे. पाभरे येथे रु ग्ण सेवेसाठी जिल्हा आरोग्य खात्याचे उपकेंद्र आहे. सदरचे उपकेंद्र अन्य ठिकाणी स्थलांतरित करून म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित केल्यास पाभरे ग्रामीण भागातील लोकांना उपचारासाठी चांगली सेवा मिळण्यास मदतीचे होणार आहे. सद्य स्थितीत बंद असलेले म्हसळा प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरे येथे स्थलांतरित व्हावे यासाठी संपन्न झालेल्या रूग्णकल्याण समितीचे सभेत सर्वानुमते ठराव घेण्यात आला. सभेत म्हसळा तालुक्यातील अन्य उपकेंद्रातील आरोग्यसेवेबाबत आढावा घेऊन जास्तीत जास्त ग्रामीण भागातील रु ग्णांना चांगली सेवा कशी देता येईल याबाबत सविस्तर चर्चा करून चालू हंगामात साथीचे रोग, लसीकरण, सर्प, विंचू व अन्य श्वापदे दंशावर उपचार त्यावर लागणारा औषध साठा आदी बाबतीत उपचारासाठी दक्ष राहण्याची काळजी घ्यावी असे समितीच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना अध्यक्ष बबन मनवे यांच्यामार्फत सूचना देण्यात आल्या.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेले म्हसळा तालुका प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित नसल्याने ते तालुक्यातील अन्य ठिकाणी स्थलांतर करता येईल का याबाबत रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे यांच्याकडे विचारणा केली असता हे काम आमच्या अधिकारात नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र स्थलांतरित करण्याबाबतचा ठराव डीपीडीसीच्या सभेत मांडून तो मंत्रालयाचे आरोग्य विभागाने मंजूर केल्यानंतरच पुढील कार्यवाही करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Migration to Mhasala Primary Health Center to pabhare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.