अलिबाग : युवा पिढीला लष्करी सेवेत जाण्यासाठी मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी यासाठी ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या कार्यक्रमाचे लोकमत रायगड कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते. लष्करी अधिकाºयांनी मुलाखतीमधून कथन केलेले आपले अनुभव ऐकताना उपस्थितांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहिला.कुटूंब, नाते-गोते याची कसलीच फिकीर न करता, जीवाची बाजी लावून देशासाठी रक्त सांडणाºया वीर जवानांसाठी उपस्थितांनी जय हिंदचा नारा देऊन अख्खे नाट्यगृह डोक्यावर घेतले.आरसीएफ कंपनीने लोकमतच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी लष्करी अधिकाºयांना अभिवादन करताना टाळ््यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून ‘लष्करी ध्यासाचा सिक्सपॅक’ या कार्यक्रमाची निर्मीती करण्यात आली होती.सूर्यवंशी यांनी अधिकाºयांना बोलत करत त्यांच्या अनुभवातून संपूर्ण युध्दपटच डोळ््यासमोर उभा केला. त्यामध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन सर्व जगाचे लक्ष वेधून घेणारे लेफ्टनंट जनरल (नि.) राजेंद्र निंभोरकर यांनी, मोहिमेची केलेली तयारी कथन केली. शत्रू सैन्याच्या गोटात घुसून त्यांचा खातमा करुन आपल्या जवानांना सुखरुप छावणीमध्ये आणणारे लेफ्टनंट जनरल (नि.) निंभोरकर यांच्या धाडसाचे उपस्थितांनी कौतुक केले. हालाकीच्या परिस्थितीवर मात करुन एनडीएमधल्या आठवणींना त्यांनी उजाळा दिल्याने सर्वच अधिकारी आपापल्या भूतकाळात रमल्याचे दिसत होते.अधिकाºयांच्या शौर्यगाथा ऐकून विद्यार्थी थक्कमेजर जनरल सतीश वासाडे यांनी केलेल्या शौयगाथा ऐकून विद्यार्थी थक्क झाले. ब्रिगेडीयर विनोद श्रीखंडे, कर्नल मदन सावंत, मेज. जनरल सतीश वासाडे यांनीही आपले अनुभव कथन केले. आई-वडील, शिक्षक यांचे आभार माना त्याचबरोबर ज्याच्यामुळे आपण अन्न खातो, त्या शेतकºयांनाही धन्यवाद द्या आणि उणे सात डिग्री सेल्सीयसमध्ये हिमालयाला आपली ऊब देणाºया जवानांचे स्मरण करा असे एअर मार्शल अरुण गरुड यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ््याचा एकच गजर केला. युवा पिढीला लष्करी सेवेत येण्यासाठी सर्वच अधिकाºयांनी प्रोत्साहीत करताना सर्वतोपरी मदत करण्याचे वचनही दिले.
लष्करी अधिकाऱ्यांचे अनुभव शहारा आणणारे; जिल्हाधिका-यांनी घेतली मुलाखत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:53 PM