शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

कोट्यवधींच्या जमिनी दुसऱ्यांच्या खिशात

By admin | Published: August 16, 2015 11:38 PM

रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी हजारो हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जमिनींमधील गुंतवणूक

आविष्कार देसाई, अलिबागरायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी हजारो हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जमिनींमधील गुंतवणूक ही अतिशय सुरक्षित आणि फायदेशीर समजली जाते. त्यामुळेच जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. सरकारच्या जमिनींवर अतिक्रमण करून काहींनी त्या आपापल्या खिशात घातल्या आहेत. त्याच जमिनी परत मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आता कंबर कसली आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणाऱ्या जमिनींवर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, याची जंत्री रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी काढण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव काहीच दिवसांवर आला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात नुकत्याच एका बैठकीचे आयोजन केले होते.मे. अध्यक्ष लोकल बोर्ड पेण, स्कूल बोर्ड, जिल्हा लोकल बोर्ड कुलाबा या जागा रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत. या जागांची व्याप्ती मोठ्या संख्येने असल्याने त्या जागेचा आजच्या बाजारभावाप्रमाणे हिशेब केल्यास तो कोट्यवधींच्या घरात जाऊ शकतो. या जमिनी पुन्हा जिल्हा परिषदेच्या नावावर करून घेण्यासाठी संबंधित तलाठ्यांची मदत त्या-त्या ग्रामसेवकांनी घ्यावी, अशी सूचना चित्रा पाटील यांनी केली.या जमिनी पुन्हा जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यास आवश्यक असणाऱ्या विकासकामांसाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्नही जिल्हा परिषदेला मिळू शकते. त्या जागांचा शोध घ्यावा, अशी सूचना पाटील यांनी केली आहे.