शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

गाळ काढण्यासाठी कोट्यवधींच्या निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 5:05 AM

मांडवा बंदरात १६ कोटी ५० लाख खर्च : एमएमबीने पुन्हा काढली निविदा

आविष्कार देसाईअलिबाग : महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड (एमएमबी)ने मांडवा येथे गाळ काढण्याच्या कामासाठी पाच महिन्यांत खासगी यंत्रणेवर तब्बल १६ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च केला. यावरून वाद निर्माण झाला असतानाच, आता एमएमबीने पुन्हा गाळ काढण्याबाबत चार कोटी ५० लाख रुपयांची निविदा काढली आहे. त्यानुसार एक लाख २५ हजार क्युबिक मीटर गाळ काढण्यात येणार आहे. सातत्याने गाळ काढण्यासाठीच कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

पाच महिन्यांपूर्वी मांडवा बंदरातील गाळ काढण्यासाठी एमएमबीने १६ कोटी ५० लाख रुपये खर्च केले आहेत. मांडवा बंदरातून काढलेला गाळ, त्यावर देखरेखीसाठी नेमलेले व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस) लाँगबुकमधील नोंदी, त्यांची छायाचित्रे, गाळ कुठे टाकला, गाळाचे वजन कोणत्या प्रकारे केले, यासर्व बाबी माहिती अधिकारात उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. निविदेची चौकशी करून सरकारचे झालेले साडेसोळा कोटींचे नुकसान संबंधितांकडून वसूल करून फसवणूक केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार अलिबाग येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी राज्य सरकारच्या गृहविभागाकडे केली आहे. साडेसोळा कोटी रुपयांच्या गाळ उपसण्याच्या कामाबाबत तक्रारी असतानाच एमएमबीने पुन्हा साडेचार कोटी रुपयांचेगाळ काढण्याचे नवीन टेंडर काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या ४ जानेवारी २०१८ अन्वये मांडवा ते भाऊचा धक्का या दरम्यानच्या रो-रो सेवेकरिता नौकानयन मार्गातील गाळ काढण्याच्या कामाकरिता सुमारे १८ कोटी १२ लाख रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानुसार महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून मे. रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेझिंग प्रा. लि. या कंपनीस काम देण्यात आले होते. या कामासाठी एकूण १६ कोटी ५४ लाख २ हजार ५१० इतके बिल कंत्राटदाराला अदा करण्यात आले आहे. या खर्चाबाबत सावंत यांनी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडे माहिती अधिकाराखाली अर्ज करून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डामार्फत रॉक अ‍ॅण्ड रिफ ड्रेझिंग प्रा. लि. कंपनीला गाळ काढण्यासाठी बंधकारक असलेल्या विहित अटी व शर्ती यांची माहिती मागितली होती.याशिवाय कामावर निरीक्षण ठेवणाऱ्या अधिकाºयाने हे काम प्रमाणित केल्याबाबतचे प्रमाणपत्र, गाळ काढण्यासाठी कंपनीकडून वापरण्यात आलेल्या बोटींची माहिती, गाळ कोठे टाकला, कंपनीला अदा करण्यात आलेल्या बिलाची प्रत, गाळ काढण्याचे काम केलेल्या बोटींना ट्रॅकिंग सिस्टीमनुसार बोटींनी किती कालावधीमध्ये गाळ काढण्याचे काम केले, याबाबतची माहिती मागितली होती.महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डामार्फत सावंत यांना जी माहिती पुरविण्यात आली ती माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टकडून प्रमाणित करण्यात आलेली नाही.व्हीटीएस यंत्रणेचा उल्लेख नाहीच्महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून मांडवा येथील गाळ उपसण्याच्या कामाचे २०१७-१८ मध्ये साडेसोळा कोटी रुपयांचे टेंडर काढण्यात आले. त्यामध्ये व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस)नुसार यंत्रणेला माहिती पुरविण्याच्या अटीचा उल्लेख नाही.च्याउलट २०१८-१९ साठी जे साडेचार कोटी रुपयांचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीटीएस)नुसार यंत्रणेला माहिती पुरविण्याच्या अटीचा उल्लेख आहे. १६ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टच्या परवानगीमधील व्हेसल ट्रॅकिंग सिस्टीमनुसार यंत्रणेचा उल्लेख नसणे ही बाब संशयास्पद असल्याचे दिसून येते.च्१६ कोटी रुपयांच्या गाळाचा उपसा करून कंपनीच्या जहाजांनी तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला आहे किंवा नाही, हे तपासणे त्यामुळे शक्य झालेले नाही.च्मेरीटाइम बोर्डाने संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली नसल्याने कंत्राटदाराने किती गाळ उपसला व किती टाकला, याबाबत साशंकता निर्माण होते, असे सावंत यांनी सांगितले.च्दरम्यान, एमएमबीचे कार्यकारी अभियंता देवरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड