‘एमआयएम मोर्चा काढणार नाही’
By admin | Published: January 7, 2015 01:35 AM2015-01-07T01:35:57+5:302015-01-07T01:35:57+5:30
एमआयएम पक्षातर्फे कोणताही मोर्चा काढण्यात येणार नसल्याचे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई : लालबागमध्ये रविवारी रात्री घडलेले प्रकरण मुंबई पोलिसांनी संयमाने हाताळले असून, यासंदर्भात एमआयएम पक्षातर्फे कोणताही मोर्चा काढण्यात येणार नसल्याचे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारपासून लालबाग घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या नावाचा वापर करून अनेक एसएमएस फॉरवर्ड होत असून, त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचेही पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
काही सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट होणाऱ्या एसएमएसमध्ये घटनेत नुकसान झालेल्यांनी एमआयएम पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र असा एसएमएस स्वत: किंवा पक्षाने पाठवला नसल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले. खोटे एसएमएस पसरवणाऱ्यांची पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)