घारापुरीतील शेतबंदर येथे मिनीट्रेनला अपघात, पर्यटक बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 04:41 AM2018-12-24T04:41:39+5:302018-12-24T04:42:42+5:30
घारापुरी बेटावर पर्यटकांची वाहतूक करणारी मिनीट्रेन रुळावरून घसरून रविवारी अपघात झाला.
उरण : घारापुरी बेटावर पर्यटकांची वाहतूक करणारी मिनीट्रेन रुळावरून घसरून रविवारी अपघात झाला. मात्र, या अपघातातून प्रवास करणारे देशी-विदेशी पर्यटक थोडक्यात बचावले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात आली. मात्र, वारंवार होणाऱ्या मिनीट्रेनच्या अपघातामुळे पर्यटकांची सुरक्षाच धोक्यात आली आहे.
घारापुरी बेटावर दररोज हजारो देशी-विदेशी पर्यटक लेण्या पाहण्यासाठी येतात. गेटवे आॅफ इंडिया येथून घारापुरी बेटावरील शेतबंदर जेट्टीवर उतरल्यावर देशी-विदेशी पर्यटकांसाठी खासगी कंपनीकडून मिनीट्रेनची सेवा पुरविते. आबालवृद्ध पर्यटक सहलीचा आनंद लुटण्यासाठी मिनीट्रेनच्या प्रवासालाच प्राधान्य देतात.
रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास पर्यटकांना घेऊन जाणारी मिनीट्रेन रु ळावरून घसरली. मात्र, यात पर्यटक थोडक्यात बचावले.
शेतबंदर येथील मिनीट्रेनला अपघात होण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात काही विदेशी पर्यटक जखमी झाले होते. वारंवार होणाºया अपघातामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिनीट्रेनच्या रु ळावर इंजिनचे आॅइल सांडलेले असते, त्यामुळे रु ळ निसरडे होऊन अपघाताची शक्यता निर्माण होते. मात्र, याकडे खासगी कंपनीकडून दुर्लक्षच केले जाते. मिनीट्रेनचे आॅडिट आणि चालकाच्या अनुभवाबद्दलही प्रश्नचिन्ह आहे.
गेल्या महिन्यात बेटावर येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेबाबत झालेल्या बैठकीतही मिनीट्रेनच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा अधिकाºयांनी उपस्थित केला होता. आता या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.