मिनी ट्रेनमुळे मध्य रेल्वेच्या महसुलात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 02:30 AM2021-01-13T02:30:23+5:302021-01-13T02:30:41+5:30

माथेरानच्या राणीला पर्यटकांची पसंती

Mini train increases revenue of Central Railway | मिनी ट्रेनमुळे मध्य रेल्वेच्या महसुलात वाढ

मिनी ट्रेनमुळे मध्य रेल्वेच्या महसुलात वाढ

googlenewsNext

मुकुंद रांजाणे

माथेरान : अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी वन डे ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली. माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या ‘मिनी ट्रेन’मधून फिरण्यास सर्वांनी पसंती दर्शविली आहे. यातून मध्य रेल्वेच्या महसुलात ३३ लाख २६ हजारांची भर पडली असल्याची  माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले होते. अनेक महिने घरात कोंडून राहावे लागल्यामुळे सर्वांना बाहेरच्या ठिकाणी फिरण्याचे वेध लागले होते. त्यामुळे अनलॉक होताच मुंबई महानगरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी 'वन डे' ट्रिप म्हणून माथेरानची वाट धरली आहे. सध्या माथेरान स्थानकापासून ते अमन लॉज मिनी ट्रेनमधून पर्यटक प्रवास करत आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मिनी ट्रेनची वाहतूक बंद होती; मात्र नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन सुरू झाली. सुरुवातीला अमन लॉज ते माथेरानदरम्यान शटल सेवेच्या दिवसाला चार फेऱ्या सुरू करण्यात आल्या. दिवाळीनंतर मध्य रेल्वेने दिवसाला १२ फेऱ्या सुरू केल्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या महसुलात लाखोंची भर पडली.

रेल्वेला प्राप्त झालेला महसूल
महिना    प्रवासी संख्या    महसूल
नोव्हेंबर    १६ हजार ९४६    ११ लाख ३८ हजार 
        १५७ रुपये
डिसेंबर    २८ हजार १८६    १७ लाख ३१ हजार 
        ५६७ रुपये
एकूण    ४५ हजार १३२    २८ लाख६९ हजार 
        ७२४ रुपये

तिजोरीत लाखांची भर
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मिनी ट्रेनमधून सात हजार ५५७ प्रवाशांनी प्रवास केला, यातून चार लाख ९१ हजार २९८ रुपयांची भर मध्य रेल्वेच्या तिजोरीत पडली.

Web Title: Mini train increases revenue of Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.