अलिबाग - साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या दसऱ्याचा मुहूर्त साधून करण्यात येणाऱ्या सोने खरेदीला मंगळवारी आर्थिक मंदीचा क्षय जाणवला. लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असूनही मंदीच्या क्षयामुळे सोने खरेदीचा आनंद लुटताच आला नाही. त्यामुळे मार्केट परीसरात ही शुकशुकाट दिसून येत होती. तर यावर्षी पुन्हा साधारणता साडेचार कोटींची उलाढाल थंडावली आहे. बाजारपेठेतील सोन्याच्या झळाली हरपली, व्यापारी चिंतेत होते.
साडेतीन मुहूर्तापैकी एक पुर्ण मुहूर्त असे दसऱ्याचे म्हणजेच विजया दशमीचे महत्त्व आहे. या मुहूर्तावर सोने खरेदीला नागरिक प्राधान्य देतात. दसऱ्यापासून शुभ कार्याचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे लग्नसराईचा मोसम सुरू होण्याआधीचा सण असल्याने सोने खरेदीला ऊर्जा मिळेल अशी अपेक्षा सराफ व्यावसायिकांना होती. मात्र, वाढती महागाई आणि त्याच्या जोडीला जाणवत असलेल्या आर्थिक मंदीचा प्रभाव यंदाच्या सोने खरेदीवरही होता. काही सराफांनी तर, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविल्या होत्या. मात्र, तरीही सोने खरेदीला म्हणावी तेवढी चालना मिळाली नसल्याचे जाणवले, अशी माहिती काही सराफांनी दिली.
दसऱ्याला सोने खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असते. मात्र, या सणाला यंदा आर्थिक मंदीचा फेरा जाणवत आहे, सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकांना सोने खरेदीची इच्छा असूनही सोने खरेदी करता आला नाही. काही ग्राहकांनी केवळ मुहूर्ताचीच खरेदी केली. महागाईमुळे सोने खरेदी होत असली तरी जेवढे बजेट आहे त्यामध्ये बसेल तेवढेच सोने खरेदी करण्याकडेच ग्राहकांचा कल असल्याचे जाणवले.दसऱ्याच्या दिवशी का केली जाते सोन्याची खरेदी?
- विजया दशमीच्या दिवशी जे शुभ कार्य केले जाते त्याला अधिक फल मिळते. तसेपण बारा महिन्यातील सर्व शुक्ल पक्षीय तृतीया शुभ मानल्या जातात. त्यामुळे या दिवसांत केलेली सोन्याची खरेदी ही सर्वात लाभदायक असते.काय असेल दसऱ्याला सोन्याचा भाव?
यंदा ग्राहकांचा उत्साह कभी खुशी कभी गम प्रमाणे दिसून आला आहे. गेल्यावर्षी सोन्याचा भाव हा 54 हजार 850 रुपये इतका होता. तर यंदा तो भाव 61 हजार रुपये इतका असणार आहे. त्याचप्रमाणे यंदा मंदिचा फटका मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ग्राहक सोन्याची खरेदी दिसत नाही.
साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वाचा समजला जाणारा सण म्हणजे दसरा. सोने खरेदी बरोबरच अलिबाग शहरात आज नवनवीन दुकाने, गाळे, कार्यालये यांचे उद्घाटने करण्यात आली आहेत. तर काहींनी वाहन व फ्लॅट खरेदी करण्याकडे आपला मोर्चा वळविला होता.