माथेरान घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी मिनीट्रेन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:05 AM2019-09-01T01:05:55+5:302019-09-01T01:06:36+5:30

शटल फेरीही बाधित । रेल्वेसेवा खंडित झाल्याने पर्यटकांसह स्थानिकांमधून नाराजी

Minitrain closed for repair of Matheran Ferries | माथेरान घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी मिनीट्रेन बंद

माथेरान घाटमार्गाच्या दुरुस्तीसाठी मिनीट्रेन बंद

Next

माथेरान : अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान घाटमार्गावर दरडी कोसळून मोठे नुकसान झाले आहे आणि याच दुरुस्तीपायी अमन लॉज ते माथेरान धावणारी शटल फेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून पर्यटनावरही परिणाम होत आहे.पर्यटकांचे आकर्षण असले तरी मिनीट्रेनला नेहमीच तांत्रिक अडचणी येत असतात, त्यामुळे ही वाहतूक बहुतांश वेळी अनियमितपणे सुरू असते. नेरळ-माथेरान रेल्वेमार्गावर काही ठिकाणी दरडी कोसळून नुकसान झाले आहे.

रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार असून त्याकरिता जवळपास १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सूत्रांकडून समजते. अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल फेरीचा लाभ घेणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. तीन किलोमीटरच्या मार्गावर कुठल्याही प्रकारचा घाट सेक्शन नसतानाही केवळ इथे लोको शेड नसल्याने ही सेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे. यापूर्वी अशी अडचण कधीच आली नसल्याचे स्थानिक सांगतात.

मागील काळात शटल फेरी शुल्लक कारणावरून बंद करण्यात आल्यावर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेच्या वरिष्ठांकडे पाठपुरावा केल्यामुळे सुरू झाली होती. आताही पुन्हा बारणे यांना भेटून लवकरच शटल फेरी सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
- प्रसाद सावंत,
गटनेते,
माथेरान नगरपालिका
 

Web Title: Minitrain closed for repair of Matheran Ferries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.